दिलीप कुमार यांच्या निधनाने सगळ्यानाच धक्का बसला आहे. वयाच्या ९८व्या वर्षी दिलीप कुमार यांचे निधन झाले. बुधवारी त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भारतात शोककळा पसरली होती. तर, दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केलं की सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या दिलीप कुमार यांना भारतरत्न पुरस्कार का मिळाला नाही. दिलीप कुमारांच्या निधनावर शत्रुध्न सिन्हा म्हणाले भारतीय चित्रपटाचा शेवटचे राजे निघून गेले.

शत्रुघ्न यांनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. यावेळी ते भारतरत्न या पुरस्काराविषयी बोलले. “आम्ही राज कपूर आणि देव आनंद यांना १९८८ आणि २०११ मध्ये गमावले. अजुन आमच्या जखमा बऱ्या झाल्या नव्हत्या. आता चित्रपटाचे शेवटचे राजाही चालले गेले. या तिनही व्यक्ती खूप चांगल्या होत्या. दिलीप कुमार तर एक दुर्मिळ अभिनेते होते. त्यांच्या निधनाने तर गंभीर धक्का दिला आहे. हे खरं आहे की हा कार्यक्रम सुरुच राहिल, मात्र पहिले सारखं कधीच होणार नाही,” असे शत्रुघ्न म्हणाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

दिलीप कुमार यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार न दिल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “मला दिलीप साहेबांची तुलना इतर कोणाशीही करायची नाही, परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.’ दिलीप कुमार यांना १९९१ मध्ये सरकारने ‘पद्म भूषण’ देत सन्मानित केले होते. १९९४ मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर २०१५ मध्ये दिलीप कुमार यांना ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.”

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

शत्रुघ्न पुढे म्हणाले, “दिलीप कुमार ‘ट्रॅजडी’ किंग म्हणून ओळखले जात होते. तर पडद्यावर त्यांची विनोद करण्याची वेळ ही खूप चांगली होती. जर आपण वेळेत विनोद केला तेव्हा तो विनोद होतो. दिलीप साहेब विनोदी काम करण्यातही तितकेच पारंगत होते. ‘आझाद’ आणि ‘गंगा जमना’ या चित्रपटाचे उदाहरणही त्यांनी दिले.”

Story img Loader