बॉलिवूड अभिनेते आणि काँग्रसचे नेते शत्रूघ्न सिन्हा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पाकिस्तानमधील एका लग्नसोहळ्याला हजेरी लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

शत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लाहोर येथे एका लग्न सोहळ्यात हजेरी लावली. त्यांच्या या हजेरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाकिस्तानी फोटोग्राफर ओसमान परवेज मुगलने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘रीमा आणि शत्रू जी यांनी हेमा आणि अहमद यांच्या कव्वाली नाइटला हजेरी लावली’ असे कॅप्शन दिले.

आणखी वाचा : पाकिस्तानी आयोजकाच्या भारत विरोधी भूमिकेमुळे सलमानने रद्द केला शो

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री रीमा देखील दिसत आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकीय तणाव सुरु आहेत. अशातच शत्रूघ्न सिन्हा यांची पाकिस्तानमधील लग्न सोहळ्यात हजेरी लावल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.