बोलिवूडचे जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ‘शॉटगन मुव्हिज्’ या त्यांच्या निर्मिती संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत त्याची बहिण आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनय केला असून, या जाहिरातीचे दिग्दर्शन कुशने केले आहे. या आधी त्याने ‘सावरिया’ चित्रपटासाठी संजय लिला भन्साळींबरोबर आणि ‘बेशरम’ व ‘दबंग’ चित्रपटासाठी अभिनव कश्यपबरोबर सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. ‘शॉटगन मुव्हिज्’ तर्फे निर्मित करण्यात अलेली ही त्यांची पहिलीच जाहिरात असून, कुश या जाहिरातीद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या जाहिराती विषयी बोलताना कुश म्हणाला, ग्राहकाला निर्मिती प्रक्रियेत सहभागी करून आमच्या टीमने संपूर्णपणे या जाहिरातीची निर्मिती केली आहे. सोनाक्षीच्या चाहत्यांना देखील ही जाहिरात खूप आवडल्याचे त्याने सांगितले.
(सौजन्य – पीटीआय)
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2014 रोजी प्रकाशित
शत्रुघ्न सिन्हाचा मुलगा कुश दिग्दर्शकाच्या भूमिकेत
बोलिवूडचे जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. 'शॉटगन मुव्हिज्' या त्यांच्या निर्मिती संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत त्याची बहिण...

First published on: 25-02-2014 at 05:41 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाक्षी सिन्हाSonakshi Sinhaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinhas son kussh turns director for sister sonakshi sinha