Shefali Jariwala Death Updates 28 June 2025 : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. मुंबईत शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शेफालीचे कुटुंबीय व तिच्या इंडस्ट्रीतील मित्रमंडळींनी साश्रूनयनांनी तिला अखेरचा निरोप दिला.

मुंबई पोलिसांना शेफालीच्या निधनाची बातमी मध्यरात्री ( शुक्रवार २७ जून ) मिळाली होती. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तिला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला होता.

“अभिनेत्री मुंबईतील अंधेरी परिसरात राहत होती. तिचा पती व कुटुंबातील अन्य सदस्य तिला रात्री उशिरा रुग्णालयात घेऊन पोहोचले होते आणि त्यानंतर डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केले”, असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे, असं वृत्त एएनआयने दिलं आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीसह अन्य चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात दोन मदतनीस, सुरक्षा रक्षक यांचाही समावेश आहे.

शेफाली जरीवालाबद्दल सांगायचं झालं, तर तिचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. अभिनेत्रीने आजवर अनेक शो, चित्रपट तसेच गाण्यांच्या अल्बममध्ये काम केलेलं आहे. ‘नच बलिए’ कार्यक्रमात देखील शेफालीने सहभाग घेतला होता. तर ‘बिग बॉस १३’ मध्ये अभिनेत्री स्पर्धक म्हणून झळकली होती. २००४ मध्ये शेफालीचं पहिलं लग्न संगीतकार हरमीत सिंग याच्याशी झालं होतं. या दोघांचा २००९ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने २०१५ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं.

Live Updates

Entertainment News Updates 28 June 2025

19:32 (IST) 28 Jun 2025
Shefali Jariwala Funeral : शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देताना पती पराग त्यागीला अश्रू अनावर...

Shefali Jariwala Funeral : शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देताना पती पराग त्यागीला अश्रू अनावर...

https://www.instagram.com/reel/DLcdv3GItxy/?utm_source=ig_web_copy_link

17:02 (IST) 28 Jun 2025

"विरोध हिंदीला नाही, ती..."; शरद पोंक्षे यांनी हिंदी सक्तीसंदर्भात मांडलं मत

Sharad Ponkshe Post on Hindi Controversy : शरद पोंक्षे यांनी हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ...वाचा सविस्तर
15:32 (IST) 28 Jun 2025

Shefali's last rites details - शेफाली जरीवालाच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

समोर आलेल्या माहितीनुसार २८ जून २०२५ रोजी ओशिवरा येथील स्मशानभूमीत शेफाली जरीवालाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

https://www.instagram.com/reel/DLcETOyy05D/?utm_source=ig_web_copy_link

14:41 (IST) 28 Jun 2025

Parag Tyagi at Cooper Hospital : शेफालीचा पती पराग त्यागी कूपर रुग्णालयात पोहोचला...

शेफाली जरीवालाच्या निधानाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याठिकाणी आता शेफालीचा पती पराग त्यागी पोहोचला आहे.

https://www.instagram.com/reel/DLb0fo3To9O/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MWNwOXZhcDM1Y2ZqYg==

14:33 (IST) 28 Jun 2025

२२ व्या वर्षी लग्न अन् ५ वर्षांत मोडला संसार, शेफाली जरीवालाचा पहिला पती होता 'हा' गायक; पराग त्यागीशी केलेलं दुसरं लग्न

Who was Shefali Jariwala first Husband : कोण होता शेफाली जरीवालाचा पहिला पती? वाचा... ...सविस्तर वाचा
12:44 (IST) 28 Jun 2025

"माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत…", शेफाली जरीवालाची 'ती' इच्छा नकळतपणे झाली पूर्ण, Video होतोय व्हायरल

Shefali Jariwala Death : शेफाली जरीवालाचं निधन, अभिनेत्रीची कोणती इच्छा नकळतपणे पूर्ण झाली? काही महिन्यांपूर्वी मुलाखतीत केला होता खुलासा ...सविस्तर बातमी
11:34 (IST) 28 Jun 2025

पोटच्या मुलीच्या निधनाचा धक्का; शेफाली जरीवालाच्या आईला अश्रू अनावर, हृदयद्रावक Video आला समोर

Shefali Jariwala Death : शेफाली जरीवालाच्या निधनाचा आईला बसला धक्का, रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ आला समोर... ...वाचा सविस्तर
10:42 (IST) 28 Jun 2025

"त्यांची गाडी...", शेफाली जरीवालाच्या बिल्डिंगच्या वॉचमनने काय पाहिलं? किती वाजता घडली घटना? वाचा...

Shefali Jariwala Passed Away : शेफाली जरीवालाने शुक्रवारी (२७ जून रोजी) अखेरचा श्वास घेतला. ...सविस्तर वाचा
10:42 (IST) 28 Jun 2025

अभिनेत्री शेफाली जरीवाला 'इतक्या' कोटींच्या संपत्तीची मालकीण, १९ व्या वर्षी केलेली करिअरची सुरुवात

Shefali Jariwala Death Updates : शेफाली जरीवालाला पतीने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ...अधिक वाचा
10:41 (IST) 28 Jun 2025

'कांटा लगा गर्ल' अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, पतीचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ Viral, नेमकं काय घडलं?

Actress Shefali Jariwala Passed Away: शेफाली जरीवाला ही अभिनेता पराग त्यागीची पत्नी होय. ...अधिक वाचा
10:40 (IST) 28 Jun 2025

शेफाली जरीवालाने ११ वर्षांपूर्वी केलं दुसरं लग्न, पण आई होऊ शकली नाही; म्हणालेली, “वयातील अंतरामुळे…”

Shefali Jariwala Parag Tyagi : शेफाली जरीवालाने बाळ दत्तक घेण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलं होतं. ...वाचा सविस्तर
10:26 (IST) 28 Jun 2025
Shefali Jariwala Passes Away at 42 : शेफाली जरीवालाच्या निवासस्थानी फॉरेन्सिक टीम पोहोचली

Shefali Jariwala Passes Away at 42 : अभिनेत्री मुंबईतील अंधेरी परिसरात राहत होती. तिचा पती व कुटुंबातील अन्य सदस्य तिला रात्री उशिरा रुग्णालयात घेऊन पोहोचले होते आणि तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आता शेफाली जरीवालाच्या निवासस्थानी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे, पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DLbJW6PSsj0/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MXJiNWxvbnZxNnRuag==

'कांता लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. तिच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.