Shefali Jariwal Husbnad Parag Tyagi Instagram Post : ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. शेफाली जरीवालाचे पती पराग त्यागीला तिच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. तो त्याच्या इन्स्टाग्रामद्वारे त्याची पत्नी शेफालीची आठवण काढत आहे आणि तिच्यासाठी पोस्ट लिहीत आहे.

त्याच्या लेटेस्ट पोस्टमध्ये पराग त्यागीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पराग त्यागी त्याची पत्नी शेफालीच्या आठवणीत झाड लावताना दिसत आहे. परागबरोबर त्याचा आणि शेफालीचा कुत्रा सिंबादेखील दिसत आहे.

शेफालीच्या आठवणीत परागने झाडे लावली

पराग त्यागीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो झाडे लावताना दिसत आहे. याबरोबरच परागने कॅप्शनमध्ये लिहिले आहे “परी नेहमीच निसर्गावर प्रेम करत असे आणि जगाने तिच्यावर केलेले प्रेम परत करू इच्छित असे. झाडे लावणे हे प्रेमाचे पहिले पाऊल आहे. तिला (शेफाली) नेहमीच प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ती तुम्हा सर्वांना सर्व प्रेम परत देण्यासाठी येथे आहे.”

व्हिडीओवर लोकांनी कमेंट्स केल्या

पराग त्यागीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले – हे पाहून तुमची परी खूप आनंदी होईल. त्याच वेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, नकारात्मक लोक कृपया या पोस्टपासून दूर राहा. एक चांगला माणूस आणि नवरा स्वतःला सुधारण्याचा व जगण्याचा प्रयत्न करीत आहे. एका युजरने लिहिले की, शेफाली खूप भाग्यवान होती की, तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला.

प्रसिद्ध टीव्ही जोडप्यांपैकी एक असलेले पराग त्यागी आणि शेफाली जरीवाला कायमचे वेगळे झाले आहेत. शेफालीच्या अचानक निधनानंतर पराग त्याच्या पत्नीला आवडणाऱ्या सर्व गोष्टी करत आहे. पराग दररोज इन्स्टाग्रामवर शेफालीबद्दलचे प्रेम व्यक्त करीत आहे आणि तिच्या मृत्यूनंतर तो खूप एकटा असल्याचे सांगत आहे.

शेफाली जरीवालाचे २७ जूनच्या रात्री निधन झाले. ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला. रिपोर्टसनुसार, शेफालीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफालीच्या निधनाने पराग त्यागी खूप दुखी झाला आहे. तो पोस्ट आणि फोटोंद्वारे चाहत्यांशी त्याच्या भावना शेअर करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.