अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल पुरती खचली. तिची झालेली अवस्था पाहून तिचे कुटुंबिय, मित्र-परिवारालाही अश्रु अनावर झाले होते. आपल्यालाही हेवा वाटेल असंच सिद्धार्थ-शहनाजचं नातं होतं. पण घडलेल्या घटनेनंतर शहनाजवर दुःखाचा डोंगर कोसळला. आता ती यामधून हळुहळु सावरताना दिसत आहे. विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना ती दिसते. तसेच कोणत्या ना कोणत्या कामामध्ये ती स्वतःला व्यस्त ठेवते. या कठीण काळामध्ये अभिनेता सलमान खानने शहनाजची समजूत काढताना दिसला. नुकतंच शहनाजने सलमानची बहिण अर्पिता खानने घरी आयोजित केलेल्या ईद पार्टीला हजेरी लावली होती.

शहनाज आणि सलमानमध्ये चांगलं बॉण्डिंग आहे हे आपण पाहिलंच आहे. म्हणूनच शहनाजने अर्पिताच्या ईद पार्टीला आवर्जून हजेरी लावली. याचदरम्यानचा तिचा सलमानबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान चक्क शहनाजला गाडीपर्यंत सोडताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये शहनाज त्याला मिठी मारते. त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे.

आणखी वाचा – भर गर्दीत दिल्ली एअरपोर्टवर सामानासह पळताना दिसली आलिया भट्ट, नेमकं घडलं काय?

‘मला गाडीपर्यंत सोडायला ये.’ असा शहनाजने सलमानकडे हट्ट केला. मग काय सलमानेही तिचा हट्ट पुरवला. शहनाज गाडीमध्ये बसेपर्यंत सलमान तिथेच थांबला. या दोघांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची देखील चांगलीच पसंती मिळत आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे शहनाज जशी पहिली होती तशीच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली.

आणखी वाचा – डिसेंबरमध्ये सुनिल शेट्टीची लेक विवाहबंधनात अडकणार? वडिलांची जोरदार तयारी सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटामध्येही शहनाज झळकणार आहे. जॅकलिन फर्नांडिस. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी यांसारख्या अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. पण शहनाजच्या येण्याने या पार्टीला चार चाँद लागले एवढं नक्की.