मुंबईतील ‘लालबागचा राजा’ म्हणजे अनेक सेलिब्रिटींसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान! गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. यावर्षी राज्य सरकारने सर्व करोना निर्बंध मागे घेतल्यामुळे राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. लालबाग नगरी गणरायाच्या आगमनाने सजली आहे. तसेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसत आहेत. यामध्ये आता हिंदी ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलची देखील भर पडली आहे.

आणखी वाचा – Video : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला कार्तिक आर्यन, व्हिडीओ व्हायरल

शहनाज सध्या तिच्या आगामी हिंदी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचबरोबरीने बॉलिवूड पार्ट्यांना देखील ती हजेरी लावताना दिसते. सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचं भक्तीमय वातावरण आहे. अशातच शहनाजने आता इतर सेलिब्रिटींप्रमाणेच लालबागमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

शहनाज मध्यरात्री सोमवारी (५ सप्टेंबर) तिचा भाऊ शाहबाजबरोबर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली. यावेळी पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. तिने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं खरं पण यादरम्यान एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची झलक पाहायला मिळाली. शहनाजचा भाऊ शाहबाजच्या हातावर सिद्धार्थच्या चेहऱ्याचा टॅटू पाहायला मिळाला.

आणखी वाचा – “…त्यामुळेच लालबागचा राजा” ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील पांडूची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच टॅटूने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शहनाजचा हासरा चेहरा पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. गणपती बाप्पाचा आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे, तू खूप सुंदर दिसत आहेस असं नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे. शहनाज आता हिंदी चित्रपटांमध्येही बॉलिवूडच्या बड्या कलाकारांबरोबर काम करताना दिसणार आहे.