बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, शिल्पाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शिल्पाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पाने राखाडी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. या व्हिडीओत शिल्पा इमोजीसबत चेहऱ्यावर असणारे हावभाव मॅच करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शिल्पाला ते जमले नाही. हा व्हिडीओ शेअर करत हो गई हूं मैं हैरान, मुश्किल में हा जान! जब समझ ही नहीं आया ट्रेंड, तो होगी ही रील का काम तमाम…, असं कॅप्शन देत शिल्पाने हे रील शेअर केलं आहे.

आणखी वाचा : रसिका सुनील अडकली लग्नबंधनात; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

आणखी वाचा : ‘लग्नाचा वाढदिवस विसरलो तर…’, जया बच्चन काय करतात अमिताभ यांनी केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी शिल्पाचा कुत्र्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी शिल्पा आणि राज कुंद्राला ट्रोल केलं होतं. या आधी शिल्पाने अर्ध टक्क केल्याचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला होता.

आणखी वाचा : काजोलचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी केली उर्फी जावेदशी तुलना म्हणाले…

पती राज कुंद्रा तुरुंगात असताना शिल्पाचा ‘हंगामा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लवकरच शिल्पा ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाची चाहते वाट प्रतिक्षा करत आहेत.