Shilpa Shetty Fitness Secret : शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडची फिटनेस आयकॉन आहे. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर कायम योगासने, तिचे डाएट शेअर करीत असते. शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयाबरोबरच फिटनेससाठी ओळखली जाते. वयाच्या ५० व्या वर्षीही तिच्या त्वचेची चमक आणि ऊर्जा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. त्याचे रहस्य फक्त व्यायाम नाही, तर तिचे सकाळचे आरोग्यदायी पेय (मॉर्निंग हेल्थ ड्रिंक)देखील आहे, जे ती दररोज रिकाम्या पोटी पिते.

२०१८ मध्ये एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्री म्हणालेली, “मी माझ्या दिवसाची सुरुवात दीड ग्लास कोमट पाण्याने करते. त्यानंतर मी चार थेंब ‘नोनी ज्यूस’ पिते, जे एनर्जी बूस्टर म्हणून काम करते. शेवटी मी एक चमचा खोबरेल तेलाने गुळण्या करते. ही ऑयल पुलिंगची आयुर्वेदिक पद्धत आहे.”

शिल्पा शेट्टी नाश्त्यात काय खाते?

शिल्पासाठी नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. अभिनेत्री म्हणालेली, “मी जास्त ब्रेड खात नाही म्हणून मला ताज्या फळांमधून फायबरचा डोस मिळतो. बदामाचे दूध काही प्रमाणात मुसली आणि सफरचंद किंवा आंब्याचे काही तुकडे मिसळून सेवन करणे हा माझा आवडता नाश्ता आहे. मला नाश्त्यात अंडीदेखील आवडतात.”

अभिनेत्रीने अनेकदा खुलासा केला होता की, बरेच लोक त्यांचे वजन मेंटेन करण्यासाठी संघर्ष करतात. ती म्हणाली होती, “तूप माझ्या जेवणाचा एक मुख्य भाग आहे. केळीसारखी उच्च कार्बयुक्त फळेदेखील तुमच्यासाठी खूप चांगली आहेत. ती सहज उपलब्ध आहेत. परंतु, बहुतेक लोक त्यांच्यापासून दूर राहतात. त्यांना भीती वाटते की, त्यामुळे चरबी वाढेल. तुमच्या डाएटमध्ये ब्राउन राइस समाविष्ट करा. तुम्ही तुमच्या आहारात असे अन्नपदार्थ समाविष्ट केले पाहिजेत, जे तुमचे पोट भरलेले ठेवतात आणि तुमचे वजन नियंत्रित करतात आणि तुम्हाला नैसर्गिक चमक देतात.”

शिल्पाला वाटते की, वेळेइतकेच जेवणाची वेळही महत्त्वाची असते. “जरी मला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे असले तरी मी संध्याकाळी ७:३० च्या आधी जेवण करते,” असे अभिनेत्री म्हणाली होती. ही सवय तिला तिच्या दैनंदिन दिनचर्येचे पालन करण्यास आणि संध्याकाळचा आनंद घेण्यास मदत करते.