मल्याळम भाषेतील सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१५मध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करण्यात आला. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या पुढच्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. मल्याळम चित्रपटामध्ये मोहन लाल हे मुख्य भूमिकेत दिसले होते. आता या चित्रपटाचा हिंदी सिक्वेल देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.

अजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘दृश्यम २’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा सेटवरील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजयसोबत श्रिया सरन दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘विजय त्याच्या कुटुंबीयांना वाचवू शकेल का? दृश्यम २च्या चित्रीकरणास सुरुवात’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच त्याने ही पोस्ट तब्बूला देखील टॅग केली आहे. त्यामुळे चित्रपटात अजयसोबत श्रिया सरन आणि तब्बू पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Video: अनुपम खेर यांच्या आईने केला ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक अभिषेक पाठक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. जवळपास ७ वर्षांनंतर दृश्यम २ चित्रपटावर काम करण्यात येत आहे. सध्या चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरु आहे. ‘दृश्यम’मध्ये अजय देवगण विजयच्या भूमिकेत दिसला होता. आता या भागातही अजय ‘विजय’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.