स्टारकिड्सना आपल्या पालकांमुळे किंवा कौटुंबीक पार्श्वभूमिमुळे चित्रपटांमध्ये काम मिळतं, अशी टीका बऱ्याचदा केली जाते. बॉलिवूडमधील सर्वच स्टारकिड्स या कारणामुळे टीकाकारांच्या निशाण्यावर असतात. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अनन्या पांडे याही याला अपवाद नाहीत. चंकी पांडे यांनी पैसे देऊन अनन्याला बॉलिवूडमध्ये लाँच केलं होती, अशी टीकादेखील झाली होती. अशातच ‘लायगर’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा तिला अभिनय येत नाही, ती फक्त चंकी पांडे यांची मुलगी असल्याने चित्रपटात काम मिळतंय, असं म्हणत तिला ट्रोल केलं जातंय. याच पार्श्वभूमिवर ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “मला महिलेच्या वेशात पाहून माझी मुलगी…” नवाजुद्दीनने सांगितली मुलीची प्रतिक्रिया

“माझी मुलगी श्रद्धा कपूर आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांना चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि ते करण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही,” असं म्हणत शक्ती कपूर यांनी अनन्या आणि श्रद्धाची बाजू घेतली आहे.

हेही वाचा – “माझ्या आयुष्यात…”; सीमा सचदेवाने पहिल्यांदा सांगितलं सोहेल खानपासून विभक्त होण्याचं कारण

 “जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम केले नाहीत, मेहनत केली नाही, तर तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनूच शकत नाही. खरं तर, आमच्या मुली अनन्या आणि श्रद्धा त्यांच्या मेहनत आणि संघर्षाने चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे बनल्या आहेत. त्या चंकी पांडे आणि शक्ती कपूर यांच्या मुली आहेत, म्हणून नाही,” असं शक्ती कपूर यांनी म्हटलंय.

हेही वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लुकशी होणाऱ्या तुलनेवर अर्चना पुरण सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनन्या पांडे नुकतीच विजय देवरकोंडासमवेत ‘लायगर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अनन्याला अभिनय येत नसल्याची टीका तिच्यावर केली जात आहे. अशातच शक्ती कपूर यांनी अनन्या आणि श्रद्धा मेहनतीने नाव कमवत असल्याचं म्हटलंय.