बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोललं जात होतं. मात्र आता त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.
श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ हे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आता त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ एकमेकांना कॉलेजपासून ओळखत आहेत. मात्र आता त्या दोघांचाही ब्रेकअप झाल्याचे बोललं जात आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर आणि रोहन यांचा ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणांमुळे झाला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र नुकतंच श्रद्धा कपूरने गोव्यात तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी रोहनने हजेरी लावली नव्हती. त्यानंतरच या चर्चांना उधाण आले होते.
यंदाच्या जानेवारी महिन्यापासूनच त्या दोघांच्या नात्यात खटके उडण्यास सुरुवात झाली होती. यानंतर त्या दोघांमध्ये दुरावा वाढला. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यामागचे नेमकं कारण काय? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
“महिलांना सेक्ससाठी विचारणे MeToo असेल तर…”, प्रसिद्ध अभिनेत्याच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ
दरम्यान श्रद्धा कपूर आणि रोहन हे बालपणीचे मित्र होते. त्या दोघांचे कौटुंबिक नातेही फार घट्ट होते. श्रद्धा कपूरच्या कुटुंबाला रोहन हा खूप आवडायचा. श्रद्धा आणि रोहन गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत वक्तव्य केले नव्हते. मात्र ते दोघेही अनेकदा डिनर डेटवर, तसेच एकत्र पार्टीला हजर लावताना दिसले होते. यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्यांनाही उधाण आले होते. मात्र आता ते दोघेही वेगळे झाले आहेत. दरम्यान या ब्रेकअपच्या बातमीवर त्या दोघांपैकी एकानेही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.