गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीत #MeToo या मोहिमेचं वादळ उठलं होतं. या मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. त्यामुळे कलाविश्वाशी संबंधित अनेक मोठ्या व्यक्तींची नावं समोर आली होती. काही काळ गेल्यानंतर हे वादळ थंड झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा या मोहिमेने जोर धरला आहे. नुकतंच एका प्रसिद्ध अभिनेत्याने ‘#MeToo’ या मोहिमेबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक चाहत्यांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ दिसून येते. त्यावेळी तामिळ आणि मल्याळम चित्रपट अभिनेता विनायकन याने ‘मी टू’बाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे विनायकन सध्या खूप चर्चेत आहे. विनायकन हा सध्या त्याच्या ‘ओरुथी’ (Oruthee) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यासोबतच त्याने ‘MeToo’ बाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु आहे.

नुकतंच त्याने ‘ओरुथी’ (Oruthee) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. यावेळी त्याला ‘MeToo’ मोहिमेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तो म्हणाला की, “मला ‘MeToo’ या मोहिमेबद्दल काहीही माहिती नाही. पण महिलांना सेक्ससाठी विचारणे म्हणजे ‘MeToo’ असेल, तर मी हे करत राहिन.”

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विनायकनने या प्रश्नावर उत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “MeToo म्हणजे काय? मला त्याबद्दल माहिती नाही. मला त्याबाबत जाणून घ्यायचे आहे. जर मला एखाद्या स्त्रीसोबत सेक्स करायचा असेल तर मग काय? मी माझ्या आयुष्यात १० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. मी त्या सर्व महिलांना माझ्याशी संबंध ठेवायला आवडतील का? असे विचारले होते. मी अजूनही त्यांना याबाबत विचारेन, यालाच ‘MeToo’ असे म्हणतात का?” असे तो म्हणाला.

“अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी…”, प्रसिद्ध मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीने सिनेसृष्टीला केला कायमचा रामराम

दरम्यान अभिनेत्याच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. यापूर्वीही विनायकन याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये त्याला या कारणांमुळे अटकही झाली होती. दलित कार्यकर्त्या आणि माजी मॉडेल मृदुला देवी यांनी विनायकन यांना कार्यक्रमात आमंत्रित करण्यासाठी बोलावले होते. तेव्हा अश्लील आणि अपशब्द वापरल्याचा आरोप मृदुला देवी यांनी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम ५०९, २९४ (बी) आणि केरळ पोलीस कायद्याच्या कलम १२० (ओ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विनायकनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.