श्रद्धा कपूरचं चॅट व्हायरल; फोटोग्राफर्सवर चाहते भडकले

काही कॅमेरांमध्ये श्रद्धाचं चॅट देखील कैद झालं. त्यानंतर सोशल मीडियावर हे चॅट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.

shraddha-kapoor_cover_01
(File Photo)

अभिनेत्री श्रद्धा कपूरला मुंबईतील एका स्टुडिओ बाहेर नुकतच स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी श्रद्धा एका खास व्यक्तीशी चॅट करण्यात रमली होती. श्रद्धाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये श्रद्धा खूपचं सुंदर दिसत होती. यावेळी श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये चॅट करण्यात रमली असतानाच फोटोग्राफर्सनी श्रद्धाला घेरलं आणि तिचे फोटो क्लिक करू लागले.मात्र काही कॅमेरांमध्ये श्रद्धाचं चॅट देखील कैद झालं. त्यानंतर सोशल मीडियावर हे चॅट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.

मात्र श्रद्धाचं चॅट व्हायरल झाल्यानंतर आता तिचे चाहते फोटोग्राफर्सवर चांगलेच भडकले आहेत. श्रद्धाच्या खासगी आयुष्यात डोकावल्याबद्दल आणि तिचं चॅट व्हायरल केल्याबद्दल चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. अनेक चाहत्यांनी हे चॅट एडिट केल्याचं म्हंटलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “मोबाईल वन प्लसचा आणि स्क्रीन आयफोनची व्वा” तर दुसरा चाहता म्हणाला, “पण हे चुकीचं आहे.. तिला देखील खासगी आयुष्य आहे.”

shradha-kapoor- pap-trollहे देखील वाचा: श्रद्धा कपूरचं पर्सनल चॅट व्हायरल; खास व्यक्तीला मेसेजमध्ये म्हणाली…

श्रद्धाला स्पॉट करण्यात आल्यानंतर तिचं चॅट चांगलच व्हायरल झालं होतं. श्रद्धा ज्या व्यक्तीसोबत चॅट करत होती त्या व्यक्तीचा नंबर तिने कोणत्याही नावाने नव्हे तर तीन हार्टचे इमोजी ठेवून सेव्ह केलेला या फोटोंमध्ये दिसतंय. यात श्रद्धाने लिहिलीय. “मी आयुष्यात कधी तुझ्या सारख्या व्यक्तीला भेटले नाही.” यावर उत्तरात समोरच्या व्यक्तीने लिहिलं “मला आनंद आहे की तू असा विचार करतेस.”

shradha-kapoor-chat
(Photo-Instagram@viralbhayan)

या पुढे या व्हायरल फोटोंमध्ये तिने चॅटमध्ये, “तू खरचं ऐकतोस, असं कुणी आता राहिलं नाही. तुझ्या मुळे मला कायम स्पेशल फील होतं. माझी सर्व स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी थँक्यू” असं लिहिलेलं दिसतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shradha kapoor fans get angry on photographers after her whats app chat goes virl on social media kpw

ताज्या बातम्या