scorecardresearch

आमिर खाननंतर धनुषने पाहिला ‘झुंड’, नागराज मंजुळेंची स्तुती करत म्हणाला…

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

dhanush, nagraj manjule, jhund,
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आता त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नावं ‘झुंड’ आहे. हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने हा चित्रपट पाहिला आहे. आता त्यावर धनुषने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

धनुषचा हा व्हिडीओ टीसीरीजने शेअर केला आहे. या व्हिडीओत धनुष बोलतो, “कुठून सुरुवात करू ते समजत नाही. अप्रतिम चित्रपट बनवला आहे. नागराज मंजुळे यांचा आवाज चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजेच, दुर्लक्ष करता येणार नाही असं त्याचं काम आहे. या चित्रपटातील तांत्रिक गोष्टींविषयी मी खूप काही बोलू शकतो, अप्रतिम आहे. पण अखेरीस या चित्रपटातील भावना तुमचं मन जिंकून जातात. हा अनुभव सर्वांनी घेण्यासारखा आहे. या चित्रपट पाहिल्यानंतर त्यात असलेली जादू मला खूप आनंद आहे. या चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकलं आहे. मी नि:शब्द झालोय. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असं धनुष म्हणाला.

आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2022 at 13:49 IST

संबंधित बातम्या