लॉकडाऊनमध्ये आयब्रो कसे केले? चाहतीच्या प्रश्नावर श्रिया पिळगावकरचं प्रामाणिक उत्तर

समस्त महिला वर्गाचा आताचा चिंतेचा विषय म्हणत चाहतीने विचारला प्रश्न

sachin pilgaonkar with dauther
सचिन पिळगावकर, श्रिया पिळगावकर

लॉकडाउनमध्ये सर्व पार्लर बंद असल्याने स्वत:च्या त्वचेची व सौंदर्याची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न महिलावर्गाला नक्कीच पडला असेल. काहीजण घरच्या घरी काही उपाय करत असतील तर काहीजण अजूनही लॉकडाउन संपण्याची वाट पाहत असतील. अशा वेळी जर एखादी व्यक्ती समोर आवरून, मेकअप करून सुंदर दिसत असेल तर महिलांच्या मनात प्रश्न डोकावतोच की, पार्लर बंद असताना आयब्रो वगैरे कुठे केले? अभिनेत्री व सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिचा एक व्हिडीओ पाहून चाहतीला हाच प्रश्न पडला आणि न राहवून तिने कमेंटमध्ये विचारलासुद्धा.

सचिन पिळगावकर व श्रिया एकत्र गाणं गातानाचा व्हिडीओ सुप्रिया पिळगावकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर एका चाहतीने गमतीशीरपणे श्रियाला प्रश्न विचारला, ‘आयब्रो कशा काय थ्रेडेड दिसत आहेत? (भुवया कशा काय कोरल्या गेलेल्या दिसत आहेत?) महत्त्वाचा प्रश्न. आधीपासूनच तसे आहेत की घरगुती काही उपाय केले? समस्त महिला वर्गाचा आताचा चिंतेचा विषय!’ यावर श्रियानेही उपाय सांगितला की, ‘ट्विझरने’ (घरच्या घरी भुवया कोरण्याचे साधन).

आणखी वाचा : बापलेकीची जुगलबंदी; सचिन व श्रिया पिळगावकरच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 

सध्या लॉकडाउनमध्ये पिळगावकर कुटुंबीय एकमेकांसोबत चांगलाच वेळ घालवत आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रिया पिळगावकर यांनी डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shriya pilgaonkar answer to fan who asked about her eyebrows ssv

ताज्या बातम्या