अभिनेत्री श्रुती हसन सध्या येवाडु या तामिळ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी चित्रीकरणादरम्यानच्या काही भागांची माहिती आणि छायाचित्रे ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित करण्यात आल्याने श्रुती हसनने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण आता केंद्रीय अन्वेषण शाखे(सीआयडी) च्या कायदे विभागाकडे सोपवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रीत झालेल्या येवाडु चित्रपटातील श्रुती हसनवर चित्रीत झालेले ‘डिंपल पिंपल’ गाणे सध्या इंटरनेटवर पहायला मिळत आहे. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानची काही आक्षेहार्प दृश्ये विनापरवानगी कुणीतरी जाणूनबुजून ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित केल्याची तक्रार श्रुती हसनने केली आहे. काही संकेतस्थळांवर ‘येवाडु’ हा चित्रपट अनधिकृतरित्या प्रसारितसुद्धा करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2014 रोजी प्रकाशित
अभिनेत्री श्रुती हसनची पोलिसांत तक्रार
अभिनेत्री श्रुती हसन सध्या येवाडु या तामिळ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी चित्रीकरणादरम्यानच्या काही भागांची माहिती आणि छायाचित्रे ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित करण्यात आल्याने श्रुती हसनने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

First published on: 21-05-2014 at 04:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shruti haasan lodges police complaint for leaked yevadu pictures