Shweta Tiwari On Doing 72 Hours Shift For Ekta Kapoor Show : श्वेता तिवारी ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून ती घराघरांत लोकप्रिय झाली. आज श्वेता तिच्या सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

अभिनेत्रीने अलीकडेच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील शूटिंग शेड्यूलचा तिचा अनुभव शेअर केला. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, तिने डेली सोपच्या शूटिंगदरम्यान सतत ७२ तासांची शिफ्टदेखील केली. श्वेताने एकता कपूरच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे कौतुक केले.

खरं तर, भारती टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवरील अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये श्वेता तिवारीने तिच्या थकवणाऱ्या शिफ्ट्सबद्दल सांगितले. श्वेता तिवारीने सांगितले की, तिने सतत ७२ तास शूटिंग केले आहे आणि तिला ३० दिवसांच्या महिन्यात ४५ दिवसांचा पगार मिळत असे.

श्वेता म्हणाली, “आम्ही संपूर्ण इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहोत की कोणीही झोपत नव्हते. मी ७२ तास शूटिंग करायचे. ३० दिवसांचा महिना असायचा, मला ४५ दिवसांचा चेक मिळत असे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत एक असायचा, संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत दोन असायचे.”

श्वेता तिवारीने केले एकता कपूरचे कौतुक

श्वेताने मुलाखतीदरम्यान टीव्ही क्वीन एकता कपूरच्या समर्पणाचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले आणि म्हणाली की, केवळ कलाकारांचेच वेळापत्रक इतके व्यग्र नव्हते. २२ शो हाताळताना, एकता क्वचितच झोपायची आणि नेहमीच कॉलला उत्तर देण्यासाठी उपलब्ध असायची.

श्वेता पुढे म्हणाली, “फक्त आम्ही कलाकार असे काम करत नव्हतो, एकताही असे करत असे. एकता झोपत नव्हती. तिचे २२ शो चालू होते. जेव्हा जेव्हा तुम्ही तिला फोन कराल तेव्हा ती फक्त एका रिंगमध्ये उत्तर देत असे. ती सर्वकाही डिटेलमध्ये समजावून सांगायची आणि एकदा एकता काही समजावून सांगायची की, तेव्हा कोणतीही चूक नव्हती होत. रिहर्सलदरम्यान जेव्हा जेव्हा ती डायलॉग बोलायची, तेव्हा असे वाटायचे की ती तुमच्यापेक्षा चांगली बोलत आहे, ती खूप भावनिक होती.”

श्वेता तिवारी २००१ ते २००८ पर्यंत प्रसारित झालेल्या ‘कसौटी जिंदगी की’ या टेलिव्हिजन शोमधील प्रेरणाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. ती बिग बॉस ४ ची विजेतीदेखील होती. श्वेताने ‘परवरिश’, ‘बेगुसराय’, ‘मेरे डॅड की दुल्हन’सारख्या अनेक शोमध्ये तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.