छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. श्वेताला वाचनाची प्रचंड आवड आहे. ती अनेकदा तिच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून वाचनाचा छंद जोपासताना दिसते. तिला काल्पनिक कथा असलेल्या पुस्तकांपेक्षा वास्तविक जीवनातील प्रेरणादायी कथा वाचायला आवडतात. नुकतंच तिने तिच्या पुस्तकांबद्दलच्या आवडी-निवडीबद्दल भाष्य केले आहे.

श्वेता तिवारीने नुकतंच ‘दैनिक भास्कर’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगितले. यावेळी ती म्हणाली, “मला माझ्या फावल्या वेळेत पुस्तकं वाचायला आवडतात. माझ्या शूटिंगचे वेळापत्रक कितीही व्यग्र असले तरीही मी एक तरी मनोरंजक कादंबरी वाचते. त्यातून मला फार आनंद आणि समाधान मिळते. लहानपणीपासून मला कादंबर्‍या वाचण्याची आवड होती. माझ्या आईकडून मला पुस्तकांवर प्रेम करण्याची शिकवण मिळाली आहे.”
आणखी वाचा : “मी बालिश…” सतत चिडचिड करणाऱ्या स्वभावावर जया बच्चन स्पष्टच बोलल्या

“माझ्या पुस्तकांचा संग्रह लहानपणापासूनच वाढतच चालला आहे. त्यामुळे मी फारच आनंदात आहे. माझ्याकडे किती पुस्तके आहेत हे मला माहीत नाही, पण बुकशेल्फला जागा तयार करण्यासाठी मला माझे संपूर्ण घर पुन्हा डिझाइन करावे लागेल होते”, असे श्वेता तिवारीने सांगितले.

त्यापुढे ती म्हणाली, “मला भारतीय आणि युरोपियन इतिहासाबद्दल वाचायला आवडते. तुम्ही मला माझ्या आवडत्या पुस्तकांबद्दल विचारत असाल तर मला पाउलो कोएल्होचे ‘द अल्केमिस्ट’, युवल नोआह हरारीचे ‘सेपियन्स’, अमिश त्रिपाठीचे ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ अशी अनेक पुस्तक आवडतात. मला क्रिस्टिन हॅना आणि कॉलीन हूवर यांच्या कादंबऱ्या वाचायलाही आवडतात.”

आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी जेव्हा कधी एखादे पुस्तक वाचते तेव्हा मी त्या पात्राशी स्वत:ला जोडते. यामुळे मी एक वेगळे जीवन जगते”, असे श्वेता तिवारीने म्हटले. दरम्यान श्वेता तिवारी ही सध्या ‘मैं हूं अपराजिता’ या वेबसीरीजमध्ये झळकली होती. त्यात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसत आहे.