scorecardresearch

अभिजीत खांडकेकर आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच दिसणार एकत्र, चित्रपटाचे हटके पोस्टर प्रदर्शित

सिध्दार्थ जाधव, अभिजीत खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

अभिजीत खांडकेकर आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच दिसणार एकत्र, चित्रपटाचे हटके पोस्टर प्रदर्शित

बालभारती हा शब्द उच्चारला की आपल्यासमोर येते ते बालभारतीचे पुस्तक. पण आता लवकरच या नावाचा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतले उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटाचे आज पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे हटके पोस्टर बघून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : महेश मांजरेकर म्हणतात, “संजय राऊत बिग बॉसच्या घरात आले असते तर…”

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात बालकलाकार आर्यन मेंघजी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मराठीतील आघाडीचे सिध्दार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकारही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये आर्यन शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या पोशाखात दिसत आहे. त्याच्या वडिलांच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव दिसणार आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आर्यनच्या मागे उभा असून त्याच्या हातात ऑक्सफर्डचा शब्दकोश आहे. तर आर्यनच्या आईची भूमिका अभिनेत्री नंदिता पाटकर साकारणार आहे. या पोस्टरमध्ये तीची झलक दिसत असून तिने हेल्मेट घातले आहे ज्यावर ‘टॉक इन इंग्लिश’ असे शब्द लिहिलेले आहेत. तसेच अभिनेता अभिजीत खांडकेकर याचीही झलक या पोस्टरमध्ये पहायला मिळत आहे.

हेही वाचा : मला काम करुन ट्रोल व्हायला आवडेल- अभिजीत खांडकेकर

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या विषयाची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती स्फियरओरिजीन्स यांनी केली असून नितीन नंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बालभारती हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळावे ही पालकांची तळमळ या चित्रपटातून मांडण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या