छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधनही संपूर्ण इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का मानला जातो. सिद्धार्थ शुक्लाचे निधन हृदयविकारच्या झटक्याने झाले. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने अनेक चाहते त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचे दिसत आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्ला हा सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

अवघ्या चार महिन्यांपूर्वी २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. सिद्धार्थ आणि शेहनाज ही जोडी ‘बिग बॉस १३’च्या घरात असताना चर्चेत होती. सोशल मीडियावर ‘सिदनाज’ म्हणून हे कपल लोकप्रिय होते. सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त सिदनाज यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या घरातील एका भांडणादरम्यान सिद्धार्थ म्हणतो की, “शहनाज तू माझ्यासाठी सिगारेटसारखी आहेस. मला माहिती आहे की तू मला उद्धवस्त करत आहेस. पण तरीही मी त्याचे सेवन करतो,” असे त्याने म्हटले होते.

यानंतर एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थने याबद्दल एक स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला की, “शहनाज ही बिग बॉसच्या घरात सतत माझ्याशी भांडायची. त्यामुळे पूर्ण वेळ तिला समजवण्यात जायचा. शहनाज रागवल्यामुळे कधीकधी माझाही मूड ऑफ व्हायचा. बिग बॉसच्या घरात मी सर्वाधिक काळ तिच्यासोबतच असायचो. त्यामुळेच मी असे म्हणालो होतो,” असे स्पष्टीकरण त्याने दिले होते.

हेही वाचा : “राखी मूर्ख नाही, फक्त तिची मुलांबद्दलची निवड वाईट”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या डोळे पुन्हा पाणावले आहेत. सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारही त्याची आठवण काढत आहेत. तो आपल्यात नाही, याचा अजूनही सिद्धार्थचे मित्र, चाहते आणि कुटुंबीयांना विश्वास बसत नाही, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.