छोट्या पडद्यावरील थपकी प्यार की २ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण नुकताच मालिकेतीला एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून अनेक मीम्स व्हायल झाले आहेत.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला एक अभिनेत्री मुद्दाम तिच्या हातातले सेल खाली टाकते. त्यामुळे या सेलवर पाय दिल्यामुळे एका वृद्ध महिलेचा तोल जातो आणि तिचा धक्कालागून त्यांच्या सुनेच्या हातात असलेला पुजेच्या ताटाला लागतो. त्यामुळे हे पुजेचं ताट हवेत फेकलं जातं. या ताटात पुजेचं सगळ सामान असत. तर एक महिलानंतर ताटातं असलेलं सिंदूरनंतर झेलते. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मालिकेतील कलाकारांना आणि मालिकेला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : “मुलगी आणि पत्नीसोबत पाहू शकत नाही असा चित्रपट…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : अमिताभ बच्चन आहेत क्रिप्टो किंग, १.६ कोटी रुपयांची गुंतवणुक करत कमावले ११२ कोटी रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करत एक नेटकरी म्हणाला, “२०२२ची सिंदूर लावण्याची अत्याधुनिक पद्धत पाहिलीत का?” दुसरा नेटकरी म्हणाला, “भारतीय मालिका फिजिक्सचे सगळे सिद्धांत मोडत आहेत.” तिसरा नेटकरी म्हणाला, “फिजिक्सचा कोणता सिद्धांत माझ्या लक्षात नाही.” एवढंच काय तर, “स्वर्गातून न्युटन पाहत असेल तर त्याची अवस्था काय असेल ते दाखवले आहे”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्या व्हिडीओला ट्रोल केले आहे.