हॉलिवूड ब्रास अगेंस्ट या बॅन्डची गायिका सोफिया उरिस्ता ही लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. सोफिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. नुकताच सोफियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोफियाने लाइव्ह कॉनसर्टमध्ये एका चाहत्याच्या अंगावर लघुशंका केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोफिया आणि तिच्या बॅन्डने सगळ्यांची माफी मागितली आहे. सोफियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत सगळ्यांची माफी मागितली आहे. सोफिया म्हणाली, स्टेजवर ती नेहमीच तिच्या मर्यादेत राहिली आहे. पण तिने लघुशंकेचा स्टंट करणं योग्य नव्हतं. ती म्हणाली की ती माफी मागते आणि तिचा लोकांना कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा हेतू नव्हता.

आणखी वाचा : अनुष्का शेट्टीसोबत नागा चैतन्यच्या साखरपुड्याची बातमी ऐकूण नागार्जुन यांना बसला होता धक्का

नक्की काय झालं होतं?

११ नोव्हेंबर रोजी एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सोफियाने तिच्या एका चाहत्याला स्टेजवर बोलवले आणि त्याला तिथे झोपवले. त्यानंतर सोफियाने त्याच्या चेहऱ्यावर लघुशंका केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर सोफियाला ट्रोल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : कंगना रणौतच्या ‘भीक’ या वक्तव्यावर जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोफियाने माफी मागितल्यानंतर तिच्या बॅन्डनेही सगळ्यांची माफी मागितली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. सोफिया खूप उत्साही झाली. हे आमच्यासाठी अनपेक्षित होतं. यापुढे आमच्या शोमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार नाही.