‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच ती अभिनेता ओंकार भोजनेबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली होती. ओंकारबरोबरचा तिचा फोटो व्हायरल झाल्यामुळे दोघांमध्ये काहीतरी आहे, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण अंकिताने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमधून ओंकारबरोबर असलेल्या नात्यावर भाष्य केलं. दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं असल्याचे सांगून अंकिताने या चर्चांना पूर्णविराम दिला. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठी माणसाने कोणती गोष्ट सोडली पाहिजे आणि कोणती गोष्ट आत्मसात केली पाहिजे? याविषयी अंकिता स्पष्टच बोलली आहे.

हेही वाचा – ‘ताली’ सीरिजला एक महिना पूर्ण, छोट्या गौरी सावंतनं सादर केली अप्रतिम कलाकृती, व्हिडीओनं वेधलं लक्ष

हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने नाना पाटेकरांची घेतली भेट, अनुभव सांगत म्हणाली, “इतका साधेपणा…”

‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला अंकिता वालावलकरनं नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘मराठी माणसाने कोणती गोष्ट सोडली पाहिजे आणि कोणती गोष्ट आत्मसात केली पाहिजे?’ यावर ती म्हणाली की, “मराठी माणसाने पाय खेचण्याची वृत्ती सोडली पाहिजे. आणि आत्मसात ही गोष्ट गेली पाहिजे की, आपण दुसऱ्यांना म्हणतो ना, तो बघ तो कसा पुढे गेला? तर तो का पुढे गेला? तो काय करतोय? या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.”

हेही वाचा – “आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर अंकिताला विचारलं गेलं की, ‘पाय खेचण्यासारख्या गोष्टी तुझ्याबरोबर घडल्या आहेत का?’ तेव्हा ती म्हणाली की, “भरपूर घडल्या आहेत. त्याला काही मर्यादाच राहिली नाहीये.” मग तिला विचारलं, ‘फॉलोवर्स कडून होतं का?’ यावर अंकिता म्हणाली की, “आता फॉलोवर्समध्ये ओळखू शकत नाही की, द्वेष करणारे कोण आहेत? आणि खरे फॉलोवर्स कोण आहेत? काही जण तर असे आहेत, ज्यांनी माझ्या पोस्टवर नकारात्मक प्रतिक्रिया करण्यासाठी बनावट सोशल मीडियाचं अकाऊंट उघडलं आहे. म्हणजे यांच्याकडे किती वेळ आहे बघा. पण जेव्हा आपलं आयुष्य सार्वजनिक करतो तेव्हा या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावीच लागते. मला ती सवय हळूहळू होतेय.”