scorecardresearch

VIRAL VIDEO : सोहेल खानच्या चेहऱ्याची अशी अवस्था का झाली? बदलता लुक पाहून व्हाल हैराण

अभिनेता सोहेल खानचा विचित्र लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

sohail khan new look, sohail khan troll,
अभिनेता सोहेल खानचा विचित्र लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या काही काळापासून सलमान खानचा भाऊ सोहेल खान चित्रपट तसेच झगमगत्या दुनियेपासून दूरच आहे. सोहेलने सध्यातरी चित्रपटांपासून दूर राहण्याचा बहुदा निर्णय घेतला असावा. तसेच फार कमी वेळा सोहेल कॅमेऱ्यासमोर आलेला दिसतो. सोहेल त्याची पत्नी, मुलांबरोबर एकत्रित वेळ घालवणं अधिक पसंत करतो. त्याच्या लुकची किंवा स्टाइलची फारशी चर्चा होत नसली तरी त्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सोहेल त्याच्या फिटनेसकडे नेहमीच लक्ष देताना दिसतो. जिममध्ये काही वेळ घालवणं हा त्याच्या दिनक्रमामधलाच एक भाग. असाच त्याचा जिममधून बाहेर येतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमध्ये त्याची झालेली अवस्था पाहून नेटकरी देखील बुचकाळ्यात पडले होते. त्याचा संपूर्ण लुकच बदलेला दिसत होता.

आणखी वाचा – गालावर हात फिरवला, मिठी मारली अन् म्हणाली….शहनाज-सलमानचा व्हिडीओ होतोय VIRAL

संपूर्ण चेहरा सुजल्याने हाच का सोहेल खान? असा अनेकांना प्रश्न पडला. तर काहींनी त्याची झालेली ही अवस्था पाहून त्याला ट्रोल करण्यास देखील सुरुवात केली. हातात जिम बॅग, गुलाबी रंगाचे टि-शर्ट, शॉर्ट ग्रे रंगाची पँट सोहेलने परिधान केली होती. पण त्याच्या चेहऱ्याची ही विचित्र अवस्था कशामुळे झाली? याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री लावणीवर ठेका धरते तेव्हा…; हा खास व्हिडीओ एकदा पाहाच

‘आधी तू कसा दिसत होतास आता कसा झाला आहेस’, ‘तुझी ही अशी अवस्था कशी झाली?’, ‘तु इतका सुजलेला का वाटतो?’ असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी सोहेलला विचारण्यास सुरुवात केली. पण खरंच या अवतारामध्ये सोहेलला पाहून सारे जण अवाक् झाले. सोहेलने अनेक हिंदी चित्रपट बॉलिवूडला दिले. तो अभिनयापर्यंतच थांबला नाही तर त्याने लेखक, निर्माता म्हणून देखील काम केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sohail khan different look video viral on social media and actor troll because of his face kmd

ताज्या बातम्या