Son of Sardaar 2 Box Office collection day 7 : अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार २’ १ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला तृप्ती डिमरी व सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘धडक २’ व ‘सैयारा’कडून स्पर्धेचा सामना करावा लागला. ‘सन ऑफ सरदार २’ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सातव्या दिवशी म्हणजे गुरुवारी ‘सन ऑफ सरदार २’ने किती कमाई केली? जाणून घेऊयात.

अजय देवगणव्यतिरिक्त, रवी किशन व मृणाल ठाकूर हे ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हळूहळू हा चित्रपट संथ गतीने पुढे जात आहे. चित्रपटाने बुधवारी सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.६४ कोटी रुपये कलेक्शन केले.

‘सन ऑफ सरदार २’चे ७ व्या दिवसाचे कलेक्शन

आता गुरुवारचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘सन ऑफ सरदार २’ने ७ व्या दिवशी १.४० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. अशा प्रकारे भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ३२ कोटी ८९ लाख रुपये झाले आहे.

अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार २’ आणि सिद्धार्थ चतुर्वेदीचा ‘धडक २’ हा चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. त्याच वेळी अहान पांडेचा ‘सैयारा’ हा चित्रपट आधीच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत होता.

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘धडक-२’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाची कथा बऱ्याच प्रेक्षकांना खूप आवडली; पण बॉक्स ऑफिसवर त्याचा परिणाम दिसून येत नाही. ‘धडक २’ने पहिल्या दिवशी तीन कोटी ७५ लाख कोटींच्या कमाईने सुरुवात केली. त्याच वेळी जर आपण त्याचा आलेख पाहिला, तर त्यात बरेच चढ-उतार आले आहेत. बुधवारी ‘धडक २’ने १.०४ कोटी रुपये कमावले. आता त्याचे गुरुवारचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘धडक २’ने आतापर्यंत सातव्या दिवशी एक कोटी रुपये कमावले आहेत. ‘धडक २’ने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर १६ कोटी ४४ लाख रुपये कमावले आहेत. कमाईच्या बाबतीत ‘धडक-२’पेक्षा ‘सन ऑफ सरदार २’ पुढे आहे.