सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी ‘तेवर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून, दोघेही यात त्यांचे तेवर दाखविताना दिसत आहेत.
पहिल्या छायाचित्रात सोनाक्षी संपूर्णपणे दबंग रुपात नाचताना दिसते.
दुस-या छायाचित्रात अर्जुन कपूर हा मनोज बाजपेयीसोबत लढताना दिसतो.
तर, तिस-या छायाचित्रात सोनाक्षी ही सोनेरी रंगाच्या पोशाखात नृत्य करताना तिची अदा दाखविते आहे. चित्रपटात सोनाक्षीने आग्रा येथे राहणा-या मुलीची भूमिका साकारली असून अर्जून हा सलमानच्या चाहत्याच्या भूमिकेत दिसेल. श्रुती हसनने यात ‘मदामिया’ हे आयटम गाणे केले आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ;ओक्कडू; चित्रपटचा रिमेक असलेल्या ;तेवर;चे दिग्दर्शन अमित शर्माने केले असून बॉनी कपूर आणि संजर कपूर हे याचे निर्माते आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Oct 2014 रोजी प्रकाशित
फर्स्ट लूकमध्ये पहा सोनाक्षी, अर्जुनचे ‘तेवर’
सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी 'तेवर' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून, दोघेही यात त्यांचे तेवर दाखविताना दिसत आहेत.
First published on: 13-10-2014 at 10:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha arjun kapoor show tevar in the first look of the movie