‘लॅक्मे फॅशन वीक समर/रिसॉर्ट २०१४’च्या पहिल्या दिवसाची सुरूवात डिझायनर मनिष मल्होत्राने साकारलेल्या कपड्यांच्या शोने झाली. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने डिझायनर मनिष मल्होत्राने तयार केलेला ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केले. सुंदर पांढरी एम्ब्रॉयडरी असलेला काळ्या रंगाचा पायघोळ ड्रेस परिधान करून सोनाक्षीने रॅम्पवर आगमन केले. मनिषने साकारलेला हा ड्रेस परिधान करून रॅम्पवॉक करताना सोनाक्षी खचितच सुंदर दिसत होती. लॅक्मे फॅशन वीक समर/रिसॉर्ट २०१४ फॅशन शोची सुरूवात मनिष मल्होत्राच्या अ समर अफेअर कलेक्शनने झाली. आजपासून सुरू झालेला हा फॅशन शो १६ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, या दरम्यान अनेक नामवंत डिझायनरनी साकारलेले ड्रेस प्रदर्शित केले जातील.