Sonali Bendre on Successful Marriage : अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहत्यांमध्ये सोनालीची क्रेझ पाहायला मिळते.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या ‘पती-पत्नी और पंगा’मुळे चर्चेत आहे. तिने म्हटले आहे की, लग्न यशस्वी करण्यासाठी पती-पत्नी दोघांनीही त्यांच्या नात्याकडे दररोज लक्ष दिले पाहिजे. कधीही दुर्लक्षित करू नये, कारण नाते तेव्हाच मजबूत राहते जेव्हा दोघेही मिळून ते जपतात.

सोनालीचा तरुण जोडप्यांना सल्ला

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सोनालीला विचारण्यात आले की, आजच्या तरुण जोडप्यांना ती काय सल्ला देऊ इच्छिते? सोनाली म्हणाली, आजच्या तरुण जोडप्यांना सल्ला देणे कठीण आहे, कारण त्यांना वाटते की त्यांना आधीच सर्वकाही माहीत आहे. त्यांच्याकडे इंटरनेट आहे. गूगल आणि चॅट जीपीटीसारखी साधने आहेत, जी प्रत्येक प्रश्नाचे त्वरित उत्तर देतात, म्हणून ते कोणाचाही सल्ला गांभीर्याने घेत नाहीत आणि जे त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करतात ते अनेकदा अपयशी ठरतात.

सोनाली बेंद्रेने सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य सांगितले. ती म्हणाली, माझ्या मते, लग्न ही अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज थोडी मेहनत करावी लागते. ते कधीही हलक्यात घेऊ नये. पती-पत्नी दोघांनाही या नात्यावर एकत्र काम करावे लागते आणि त्याच वेळी एकमेकांचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. सोनाली म्हणाली की, लग्न हे समानता आणि परस्पर भागीदारीवर आधारित नाते आहे.

ती म्हणाली, प्रत्येक कामात आपण सारखे असायला हवे असे नाही, पण आपल्या ताकदी एकमेकांच्या कमकुवतपणाला पूरक असाव्यात. आता मला काही गोष्टी चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि माझ्या नवऱ्याला काही गोष्टी चांगल्या प्रकारे माहीत आहेत, म्हणून आम्ही त्यानुसार आमच्या जबाबदाऱ्या वाटून घेतो. लग्न म्हणजे एकमेकांबरोबर असणे. कालांतराने तुम्हाला समजते की, कधीकधी तुम्ही जास्त तडजोड करता आणि कधीकधी तुमचा जोडीदार करतो.

अभिनेत्री पुढे म्हणाली, आयुष्यात चढ-उतार येतात. समानता म्हणजे प्रत्येक छोट्या कामात समानता नाही, परंतु दीर्घ प्रवासात एकमेकांबद्दल आदर आणि काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणजेच लग्नात सर्व काही समान नसते, परंतु प्रेम, आदर आणि सहकार्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. सोनाली बेंद्रे मानतात की, इंटरनेटने जगात आणि नातेसंबंधांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे.

ती म्हणाली, आता गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत. पूर्वी एका पिढीला बदलण्यासाठी २०-२५ वर्षे लागायची, पण आता असे दिसते की दर ३ वर्षांनी गोष्टी बदलतात. सगळं काही उलटं झालं आहे. इंटरनेटमुळे लोकांची जगण्याची आणि एकमेकांशी जोडण्याची पद्धत बदलली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री कलर्स टीव्हीवरील ‘पती, पत्नी और पंगा’ या नवीन शोमध्ये दिसणार आहे. सोनालीबरोबर कॉमेडियन मुनावर फारुकी देखील या शोचे सह-होस्टिंग करणार आहे.