scorecardresearch

Video : जेव्हा सोनाली फोगाट यांच्यावर भडकला होता सलमान खान, पाहा नेमकं काय घडलं होतं

सोनाली फोगाट बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाल्या होत्या तेव्हाचा हा किस्सा आता चर्चेत आलाय.

Video : जेव्हा सोनाली फोगाट यांच्यावर भडकला होता सलमान खान, पाहा नेमकं काय घडलं होतं
एकदा सलमान खान सोनाली यांच्यावर चिडला होता.

टिक टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन झालं. त्या केवळ टिकटॉकवरच नाही तर मनोरंजन क्षेत्रातही खूप सक्रिय आहे. इतकंच नाही तर त्यांनी सलमान खानच्या बिग बॉस शोमध्येही सहभाह घेतला होता. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बिग बॉस सारख्या मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा भाजप नेत्या सहभागी झाल्या होत्या तेव्हा त्या भांडण, संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे देखील चर्चेत होत्या. याच शोमध्ये एकदा सलमान खान सोनाली यांच्यावर चिडला होता.

सोनाली फोगाट २०२० मध्ये टीव्हीच्या सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये त्यांनी जवळपास ३३ दिवस घालवले. या ३३ दिवसांत त्यांनी त्यांच्या कुटुंबापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक किस्से सांगितले. यासोबतच त्यांचे घरातील अनेक सदस्यांशी वादही झालेले पाहायला मिळाले. पण यातही अभिनेत्री रुबीना दिलैकशी झालेलं त्यांचं भांडण विशेष चर्चेत राहिलं होतं. दोघांधील वाद एवढे विकोपाला गेले होते की अखेर सलमान खानला या सगळ्यात हस्तक्षेप करावा लागला होता.
आणखी वाचा- कपिल शर्माशी वाद की कमी मानधन? कृष्णा अभिषेकने शो सोडण्याचं काय आहे नेमकं कारण

बिग बॉस १४ मध्ये सोनाली आणि रुबीना यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. बिग बॉस १४ मधील सोनाली फोगाट यांनी टास्कदरम्यान रुबीनाला शिवीगाळ केली होती, त्यानंतर रुबिना दिलैकने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. हे भांडण पुढे एवढं वाढलं होतं की घरभर गोंधळ उडाला होता. रुबीनाने या भांडणात सोनली यांच्या मुलीचा उल्लेख केल्याने त्यांच्यात मोठा वाद झाला होता. भांडणात आपल्या मुलीचा उल्लेख झालेला सोनाली यांनी अजिबात आवडला नव्हता.

आणखी वाचा- Video : ‘रुख से जरा..’ निधनाआधी सोनाली फोगाट यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची!

या शोच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्येही एक भाग प्रेक्षकांच्या प्रश्नांसाठी असतो. या प्रश्नोत्तराच्या सत्रात सोनाली फोगाट यांना नॉमिनेशनसाठी, त्या नाराज आणि शिवीगाळ करत होत्या का?, असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारला होता. या प्रश्नावर त्या म्हणाल्या होत्या की, “मी कोणाच्याही मुलांना भांडणात ओढले नाही, पण रुबिनाने माझ्या मुलीचा उल्लेख केला होता.” सोनाली यांचं हे बोलणं ऐकून सलमान खान त्यांच्यावर रागावला होता.

याच भांडणाबद्दल निक्की तांबोळी म्हणाली होती की, सोनाली फोगाट यांनी तिला शोच्या बाहेर पाहून घेईन अशी धमकी दिली होती. यावर सोनाली यांनी, आपण कोणालाही धमकी दिलेली नाही असं म्हटलं होतं. या भांडणानंतर सलमान सोनाली यांना समजावून सांगितलं होतं. तो म्हणाला होता, “तुमची मुलगीही हा शो पाहत आहे त्यामुळे असं काहीच बोलू नका की तुम्हाला पश्चात्ताप होईल.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sonali phogat pass away when salman khan got angry on her in bigg boss 14 mrj

ताज्या बातम्या