गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. अनेकदा तिला या पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण या सर्वाचा सोनमवर परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. नुकताच सोनमने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट केली आहे. यावेळी तिच्यापोस्टवर सासूबाई प्रिया अहूजा यांनी कमेंट करताच पुन्हा सोनम चर्चेत आली आहे.

सध्या लॉकडाउनमध्ये सोनम कपूर संपूर्ण वेळ तिच्या कुटुंबीयांसोबत घालवताना दिसत आहे. खास करुन पती आनंद अहूजासोबत. नुकताच सोनमने पतीसाठी केक बनवतानाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो पाहून सोनमच्या सासूबाई प्रिया अहूजा यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘केक खूप छान आहे बेटा. पण हा केक वजन कसे सांभाळेल’ अशी कमेंट प्रिया यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सासूबाईंच्या या कमेंटनंतर सोनमने लगेच त्यांना रिप्लाय दिला आहे. ‘तुम्ही एकदम बरोबर आहात’ असे तिने म्हटले आहे. सध्या त्या दोघींमधील हा संवाद अनेकांना आवडत असल्याचे दिसत आहे.