बॉलिवूड गायक सोनू निगम हा लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. सोनूचे लाखो चाहते आहेत. सोनू हा फक्त चित्रपटातचं गाणी गात नाही तर लाइव्ह परफॉर्मन्सही करतो. परदेशातही तो अनेक शो करतो. सोनूला धमक्या दिल्यात जात असल्याचं सांगितले जात होते. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे चुलत भाऊ राजिंदर सिंग यांनी सोनूला ही धमकी दिली आहे. दरम्यान, आता स्वत: सोनूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही बातमी खरी असल्याचे सांगितले आहे.

सोनूने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओत राजिंदर सिंग बॉलिवूडची गायिका पलक मुछालच्या आईसोबत बोलत असल्याचे दिसत आहे. यावेळी ते दोघं एका कॉन्ट्रॅक्ट विषय बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर राजिंदर हे पलकच्या आईला शिवीगाळ करतात.

आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन

त्यानंतर राजिंदर यांनी सोनूला फोन केला होता. यावेळी राजिंदर सोनूला बोलतात, “तू काहीही बोलत आहेस असं मला ऐकायला येत आहे. ही चांगली गोष्ट नाही. मी बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय. तर आता गोष्ट आहे तुझ्या शोची, तर ऐकून घे फ्रीमध्ये सुद्धा मला तुझा शो करायचा नाही. तिसरी गोष्ट जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा तू मला फोन करून बोलायचास की मला मदत कर असं म्हणायचास. मी आज पर्यंत तुला फोन केला नाही. चौथी गोष्ट मला कधीच तुझ्यासोबत कोणता शो करायचा नाही. आता तुला जे करायचं ते कर मला पाहिजे ते मी करेन. तू फक्त लालची माणूस आहेस. पैशांसाठी भारतीय काय, पाकिस्तानी काय तू कुठेही विकला जातोस. तुझी काय लायकी आहे, ते मला सगळं माहीत आहे. ज्याला मी शिवीगाळ केली आहे, ती न घाबरता केली आहे”, असं म्हणतात.

आणखी वाचा : “मलाच सगळं करावं लागत अन् माझ्या भावाला….”; अमिताभ बच्चन यांच्या नातीने घरात होणाऱ्या भेदभावावर केले होते वक्तव्य

दरम्यान, व्हिडीओच्या शेवटी सोनूने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलेला मेसेज दाखवला आहे. यात इक्बाल म्हणाले आहेत की, “राजिंदर हा माझा चुलत भाऊ किंवा मग लांबचा नातेवाईकही नाही. राजस्थानमधील ज्या ठिकाणी माझा जन्म झाला आहे तो तिथलाच आहे. तुम्हाला त्याच्या या असभ्य मेसेज विरोधात कोणतीही कारवाई करायची असेल तर तुम्ही करू शकता.”

आणखी वाचा : “२ नाही ४ पेन किलर घ्याव्या लागल्या…”, आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची केआरकेने उडवली खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करत सोनू म्हणाला, “या माणसाची अपेक्षा आहे की लोकांनी त्याच्यासोबत काम करावे आणि ह्यूस्टनमध्ये होणारे सगळे कॉन्सर्ट आयोजित करण्यास त्याला सांगावे. तो श्री चहल यांच्या नावाने लोकांना धमकावत आहे.”