बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने करोना काळात असंख्य गरीबांना मदतीचा हात दिला. अगदी अन्नधान्य वाटप करण्यापासून परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरीपरत पाठवण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत सोनू सूदने केली. सामाजिक कार्यासोबत सोनू सूद सोशल मीडियावरही बऱ्याचदा सक्रिय असतो. अलीकडेच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनू सूद गुटखा खाणाऱ्या व्यक्तीला फटकारताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

खरं तर, सोनू सूद चंद्रपूरहून नागपूरच्या दिशेनं जात होता. घटनेच्या दिवशी रात्री १० ते साडेदहाच्या सुमारास तो एका टपरीवर कॉफी पिण्यासाठी थांबला. यावेळी टपरीवर गुटखा खात उभा असणाऱ्या एका युवकाला सोनू सूदने फटकारले. तसेच त्याला गुटखा थुंकण्यास सांगितलं. शिवाय येथून पुढे गुटखा खाऊ नकोस, अशी समज दिली. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ सोनूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

हेही वाचा- चार हात आणि पाय असणाऱ्या मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत; उचलला शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च

संबंधित व्हिडीओत सोनू सूद गुटखा खाणाऱ्या व्यक्तीला उद्देशून म्हणाला की, “तू गुटखा खाल्ला आहेस का? तू गुटखा कशाला खातो. तोंडातील गुटखा थुंकून ये आणि येथून पुढे गुटखा खाणं बंद कर…” असा सल्ला सोनू सूदने दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच त्याने याच कॉफी विकणाऱ्या तरुणाची विचारपूस केली. सकाळपासून चहाचे किती कप विकले? असा सवाल सोनूने विचारला. २००-३०० कप चहा विकल्यास सांगताच सोनूने ‘मला तुझ्या व्यवसायात भागीदार करशील का?’ असंही विचारलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.