बॉलिवूड अभिनेता सोनू सूद करोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी ‘मसीहा’ बनून धडपड करताना दिसून येतोय. तो जे जे काम करतोय त्याबाबतची प्रत्येक अपडेट तो स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नेहमीच देत असतो. नुकतंच त्याने शेअर केलेल्या एका ट्विटने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत डॉक्टरांना सवाल केलाय. या ट्विटमध्ये सोनूने लिहिलंय, “एक साधा प्रश्न आहे…जर आपल्या सर्वांना हे माहितेय की एक खास इंजेक्शन कुठेच उपलब्ध होत नाही तर मग प्रत्येक डॉक्टर्स लोकांना हेच इंजेक्शन लावण्याचा सल्ला का देत आहेत ? जर रूग्णालयांना हे इंजेक्शन मिळत नाहीत तर मग सामान्य जनता कुठून आणेल हे इंजेक्शन ? लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण दुसऱ्या इंजेक्शनचा वापर का नाही करू शकत ?”

या ट्विटमध्ये अभिनेता सोनूने जरी इंजेक्शनचं नाव नमूद केलं नसलं तर त्याचा इशारा हा थेट रेमडेसिवीर इंजेक्शनवरच होता. सोनूने शेअर केलेलं हे ट्विट काही मिनीटांतच अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. नेटकऱ्यांनी त्याच्या या ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया देत रिट्विट केलंय.

काही दिवसांपुर्वीच दिल्लीमधल्या एका रूग्णालयात एका करोनाविरोधात झुंज देणाऱ्या एका मुलीचं निधन झाल्यानंतर अतिशय दुःखी झाला होता. या मुलीचा रूग्णालयात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये बेडवर ही मुलगी ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील ‘लव्ह यू जिंदगी’चं गाणं ऐकून रमताना दिसून आली. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण तिच्या धैर्याला सलाम करीत होता. याच मुलीची करोनाविरोधातली झुंज अपयशी ठरली आणि तिचं निधन झालं. याबाबतची माहिती तिथल्या रूग्णालयातील डॉक्टर मोनिका लंगेह यांनी दिली.

ही बातमी कळल्यानंत अभिनेता सोनू सूदने डॉक्टर मोनिका लंगेह यांचं ट्विट रिट्विट करत लिहिलं, “अतिशय दुःखद बातमी…कधी विचारच केला नव्हता की ती तिच्या कुटूंबाला परत कधी पाहू शकणार नाही…जीवन खरंच खूप अन्यायपूर्ण आहे…असे किती जीवन आहेत जे जगण्यालायक आहेत, त्यांनाच गमावून बसतोय…आपलं जगणं कितीही सामान्य असलं किंवा सुखकर असलं तरी आपण या काळातून बाहेर पडू शकणार नाही.”

करोना काळात लोकांचा मसीहा म्हणून उदयास आलेला सोनू सूद गेल्या एका वर्षापासून लोकांना सतत मदत करत आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या करोना साथीमुळे लॉकडाउन करण्यात आलं होतं. या दिवसांमध्ये सोनूने अनेक स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी सुखरुप सोडण्याचं उदात्त काम त्याने केलं होतं. त्या दिवसांपासून आजपर्यंत सोनू अविरतपणे लोकांना मदत देण्याचं काम करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood latest tweet viral he question to doctors particular injection is not available anywhere why you recommends that injection only prp
First published on: 19-05-2021 at 15:26 IST