scorecardresearch

Premium

कानडी आणि मराठीचा झकास तडका, ‘जिवाची होतिया काहिली’ नव्या मालिकेचा व्हिडीओ व्हायरल

या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत.

Jivachi Hotiya Kahili
जिवाची होतिया काहिली

सोनी मराठी वाहिनी ही सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. येत्या १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी मालिका पाहायला मिळणार आहे. याद्वारे प्रेक्षकांची नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. याद्वारे ही मराठी आणि कानडी यांच्यातील प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत.

यात अभिनेते विद्याधर जोशी आणि अतुल काळे दिसणार आहेत. विद्याधर जोशी ही अस्सल कोल्हापुरी वेशात पाहायला मिळत आहे. तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत. ही मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

colors marathi launch new serial indrayani
संदीप पाठकसह ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री झळकणार कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत! प्रोमो पाहिलात का?
Female Cop Viral Dance Video
‘या’ गाण्यावर वर्दीतील महिला पोलिसाचा डान्स पाहून अभिनेत्री नोरा फतेहीलादेखील विसरुन जाल; VIDEO तुफान व्हायरल
Raqesh Bapat Debut in marathi serial play lead role in Navari Mile Hitler serial of zee marathi
Video: राकेश बापटचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; ‘झी मराठी’च्या ‘या’ नव्या मालिकेत झळकणार, पाहा दमदार प्रोमो
Vicky Jain Tia bajpayee photos
अंकिता लोखंडेआधी विकी जैनच्या आयुष्यात होती ‘ही’ अभिनेत्री, अनेक मालिका व चित्रपटांमध्ये केलंय काम, फोटो व्हायरल

“पांडुरंगाचा टिळा आणि गुगल मॅप्सचे अनोखे कनेक्शन”, ‘ज्ञानेश्वर माऊली’ फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

पहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्या वेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार ठरलेत. ते विद्याधर जोशी आणि अतुल काळे हे दोन्ही दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत.

विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक

त्यातही त्यांच्यातील होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.

या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकात दिसणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sony marathi jivachi hotiya kahili serial starting from 18 july nrp

First published on: 12-07-2022 at 19:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×