दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. आता या घटनेला बरेच दिवस उलटून गेले असले तरी या दोघांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या नात्याबद्दलही बरंच काही बोललं गेलं पण तरी या दोघांनी एकमेकांबद्दल वाईट असं वक्तव्य केलं नाही. आज नागा चैतन्य त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

नुकतंच एका प्रेस मिटमध्ये मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यने त्याच्या आणि समांथाच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. समांथाला प्रपोज करण्यासाठी नागा चैतन्यला किती मेहनत घ्यावी लागली याविषयी त्याने खुलासा केला आहे. याविषयी बोलताना चैतन्य म्हणाला, “तब्बल १० वर्षांपूर्वी मी आणि समांथा एका चित्रपटाच्या सेटवर भेटलो. त्यातली ७ वर्षं ही समांथाला इम्प्रेस करण्यातच गेली. माझ्याकडे तिच्याशी लग्न करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.”

आणखी वाचा : “मी कथा चोरतो…” ‘बाहुबली’, ‘आरआरआर’सारख्या चित्रपटांची कथा लिहिणाऱ्या राजामौलींच्या वडिलांचा मोठा खुलासा

याविषयीच जेव्हा समांथाला विचारण्यात आलं होतं, तेव्हा मात्र तिने हसत खेळत मस्करीत उत्तर दिलं होतं की, “नागा चैतन्य हा बऱ्याच मुलींच्या मागे होता, माझा नंबर पुढे यायला त्याने ७ वर्षं घेतली होती.” या दोघांच्या लग्नानंतरचे कित्येक किस्से आजही लोकांना ठाऊक आहेत. हे दोघे वेगळे झाल्याचं त्यांच्या चाहत्यांना पसंत पडलेलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथाने नुकतंच ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर तिच्या आणि नागा चैतन्यच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. शिवाय या दोघांनी अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत एकमेकांपासून वेगळे झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. नुकताचा समांथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शिवाय नागा चैतन्यने आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मधून हिंदीत पदार्पण केलं. समांथा ही सध्या तिच्या ‘मायोसायटीस’ या आजारामुळेही चर्चेत आहे. तिचे चाहते तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.