प्रसिद्ध तेलुगू अभिनेता साई धरम तेजचा अपघात झाला आहे. हैदराबादच्या केबल ब्रीजवर झालेल्या अपघातात हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेज आपली स्पोर्ट्स बाईक चालवत होता. मात्र या ब्रीजवर येताच त्याने आपले नियंत्रण गमावले. सध्या तो बेशुद्ध असल्याची माहिती आहे.

रिपोर्ट्सनुसार, साई धरम तेज सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अपघातावेळी तेज हा अतिवेगाने बाईक चालवत होता. अभिनेता पवन कल्याण, चिरंजीवी आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन कल्याण यांनी सांगितले, की तेजला अपोलो रुग्णालयात हलवले जाईल.

 

 

 

हेही वाचा – ENG vs IND : मँचेस्टर टेस्टसाठी BCCIच्या ‘बॉस’चा मोठा निर्णय, २२ सप्टेंबरला…

साई धरम तेज हा सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो आणि अनेकदा तो त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो. काही महिन्यांपूर्वी, त्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी ‘आस्क मी एनीथिंग’ सत्रासह संवाद साधला.