आज वाराणसी हे भारतातील एक प्राचीन शहर मानलं जात. आज या शहराला अनेक वर्षांचा इतिहास आहे. या शहरात दरवर्षी लाखो भाविक गंगा नदीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यांच शहरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले होते. गेल्या ८ वर्षात या शहराचे रूप पालटले आहे. दाक्षिणात्य अभिनेता विशालने नुकतीच या शहराला भेट दिली. तिकडचा अनुभव त्याने ट्विट केला आहे, त्याचबरोबरीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

विशालने ट्विटमध्ये लिहलं आहे ‘प्रिय मोदीजी, मी काशीला भेट दिली. तिथले दर्शन/पूजा अप्रतिम होती. गंगा नदीच्या पवित्र पाण्याला स्पर्श केला तिथल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून तुम्ही जो कायापालट केलात यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आधीपेक्षा आता ते अद्भुत दिसत आहेत. काशीचा प्रवास प्रत्येकासाठी सोपा झाला आहे. यासाठी मी तुम्हाला सलाम करतो’. विशालच्या या ट्विटवर नरेंद्र मोदींनीदेखील रिप्लाय केला आहे ते असं म्हणाले, ‘काशीमध्‍ये तुम्‍हाला विलक्षण अनुभव आला याचा आनंद झाला’.

कोण आहे विशाल?

विशाल तामिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. विशालने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तो अभिनेता झाला. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. विशालने रोमँटिक थ्रिलर ‘चेल्लामे’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता.

Photos : फक्त अक्षय कुमारच नाही, तर बिग बींसह ‘या’ कलाकारांनाही केलंय मराठी चित्रपटांमध्ये काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशालचा स्वतःचा प्रॉडक्शन स्टुडिओही आहे. ४५ वर्षीय विशालची ताकद केवळ चित्रपटातच नाही तर टीव्हीवरही दाखवली गेली. ऑक्टोबर २०१८ मध्ये होस्ट म्हणून त्याने टीव्हीवर पदार्पण केले. सोशल मीडियावर तो चाहत्यांना आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट करत राहतो.