Samrajya (KINGDOM) Official Hindi Trailer: दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडाच्या आगामी ‘किंगडम’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. निर्मात्यांनी त्याचे नाव ‘साम्राज्य’ असे ठेवले आहे. ही एका गुप्तहेराची कथा आहे, ज्याला त्याच्या कामासाठी त्याचे गाव, घर आणि आई सोडावी लागते.
या चित्रपटात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. या ट्रेलरवरून सिद्ध होते की, यात पूर्ण अॅक्शन आणि थ्रिलर पाहायला मिळेल. विजय देवरकोंडाच्या ‘साम्राज्य’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आधी दाक्षिणात्य भाषेत आणि त्यानंतर आता हिंदीत हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये विजयचा खूपच इंटेन्स लूक दिसत आहे. त्याच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
निर्मात्यांनी रविवारी ‘किंगडम ऊर्फ सामराज्य’चा ट्रेलर तेलुगू तसेच हिंदी भाषेत रिलीज केला आहे. हा चित्रपट ३१ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केले आहे.
ट्रेलरची सुरुवात एका गुप्त ऑपरेशनने होते, जिथे सूर्या ऊर्फ विजय देवरकोंडा एका धोकादायक मोहिमेवर पाठवला जातो. ट्रेलरमध्ये जोरदार अॅक्शन, डायलॉग आणि राग दिसून येतो. पार्श्वसंगीतदेखील या ट्रेलरची उत्सुकता वाढवते. चित्रपटातील अॅक्शन सीन्स वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहेत. या ट्रेलरमध्ये विजयचे जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. कधी तो जमिनीवर, कधी पाण्यात तर कधी आकाशात साहसदृश्ये करताना दिसतोय. या चित्रपटात विजयची भूमिका अत्यंत अनोखी आहे. त्याचे अनेक शत्रू आहेत. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागत आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. परंतु, जेव्हा तो मोठ्या पडद्यावर येतो, तेव्हा तो त्याच्या ऊर्जेनं आणि आक्रमकतेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतो. विजय देवरकोंडाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांना त्याच्या आगामी ‘सामराज्य’ या चित्रपटाची मोठी प्रतीक्षा होती.
चित्रपटामध्ये दिसणार हे कलाकार
‘साम्राज्य’ या चित्रपटामध्ये विजय देवराकोंडा, सत्यदेव, रामावथ चिंटू, भाग्यश्री बोरसे, मनीष चौधरी, बाबुराज हे कलाकार दिसणार आहेत. ‘साम्राज्य’ हा एक मोठ्या बजेटचा चित्रपट आहे, ज्यासाठी निर्मात्यांनी १३० कोटी रुपये (अंदाजे आकडा) गुंतवले आहेत. चित्रपट ३१ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सूर्यदेवरा नागा वंशी आणि साई सौजन्य यांनी सीतारा एंटरटेनमेंट्स आणि फॉर्च्यून फोर सिनेमाजच्या बॅनरखाली तयार केला आहे.