रजनीकांत यांच्या लेकीसह घटस्फोट, आता दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहे धनुष
कलाकारांचं लग्न, घटस्फोट याच्या बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात. कलाक्षेत्रामधील अनेक जोडप्यांनी कित्येक वर्ष एकत्र राहून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यातीलच एक जोडपं म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता धनुष व ऐश्वर्या रजनीकांत. २०२२मध्ये या दोघ एकमेकांपासून विभक्त झाले. १८ वर्ष धनुष व ऐश्वर्याने एकत्र संसार केला. आता धनुषबाबत नव्या चर्चा रंगत आहेत.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
धनुष लवकरच दुसरं लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. मल्याळम अभिनेत्री मीनाबरोबर तो विवाहबंधनात अडकरणार असल्याचं समोर आलं आहे. ‘न्यूज १८ हिंदी’च्या वृत्तानुसार, अभिनेता बलवानने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धनुषच्या दुसऱ्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. त्यांनी धनुष लग्नाची तयारी करत असल्याचंही म्हटलं आहे.
मीनाचंही हे दुसरं लग्न असणार आहे. तिला एक मुलगी आहे. शिवाय धनुषलाही यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत. पण अद्यापही धनुषने त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत मौन कायम राखलं आहे. २००२ मध्ये kadhal konden च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली होती.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासह आली होती. त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली. ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होता. मात्र आता धनुष व ऐश्वर्याच्या नात्याचा दी एण्ड झाला आहे.