दाक्षिणात्य अभिनेता नानी व अभिनेत्री किर्ती सुरेश मुख्य भूमिकेत असलेल्या ‘दसरा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. ३० मार्चला रामनवमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत १०० कोटींची कमाई केली आहे.

नानीच्या ‘दसरा’ने प्रदर्शनाच्या दिवशी १७ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ कोटींची कमाई करत या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरात ५३ कोटींचा गल्ला जमवला होता. आता चित्रपचट प्रदर्शनाच्या सहा दिवसांतच दसरा चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा>> Video: राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नाच्या चर्चांदरम्यान लंडनला निघाली परिणीती चोप्रा, लाजत म्हणाली “मी…”

हेही वाचा>> “एक्स गर्लफ्रेंड बघून जळत असेल” आकाश ठोसरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला “मला…”

नानीच्या ‘दसरा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. ६५ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रेम मिळत आहे. हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम व हिंदी अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.