देशात पुन्हा ३ लाखांपेक्षा जास्त करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अनेकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसत आहे. आता दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले असून सर्व काळजी घेत आहे.

चिरंजीवी यांनी ट्विटर अकाऊंटद्वारे करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘सर्व काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला काल रात्रीपासून करोनाची काही लक्षणे जाणवू लागली होती. मी स्वत:ला घरात क्वारंटाइन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करुन घ्या’ या आशयाचे ट्वीट चिरंजीवी यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात सध्या २२ लाख ४९ हजार ३३५ सक्रिय रुग्ण उपचाराधीन असून पॉझिटीव्हीटी रेट २०.७५ टक्क्यांवर आहे. तर, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ६८ लाख ४ हजार १४५ वर पोहोचली आहे. विकली पॉझिटिव्हीटी रेट १७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १६२.२६ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.