अभिनेता राणा दग्गुबातीचे नाव दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत घेतले जाते. त्याचे फॅन फॉलोईंग ही प्रचंड मोठे आहे. बाहुबली चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. प्रेक्षक त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत असतात. सध्या तो वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याने प्रसिद्ध विमान कंपनीच्या विरोधात ट्वीट केले आहे.

आज चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अथवा कुटुंबाबरोबर सुट्टीवर जाण्यासाठी अनेक कलाकार विमान प्रवास करत असतात. अभिनेत्रींचे एअरपोर्ट लूक विशेष घेत असतात. मात्र कधी कधी विमानाच्या बिघाड होतो अथवा विमानं उशिरा सुटतात याचा फटका प्रवाशांना बसतो. राणाने आपल्या ट्विटर अकाऊंटनवरून लिहले आहे, “भारतातील सर्वात वाईट विमान कंपनी, विमानांच्या वेळेचा पत्ता नाही, सामना हरवतात. कर्मचाऱ्यांना पत्ता नाही. यापेक्षा आणखीन वाईट काय, आणि त्याने इंडिगो कंपनीचा फोटो शेअर केला आहे.” अशा शब्दात त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

Photos : ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रींचा शिक्षणाचा पाया भक्कम; कोणाकडे कॉमर्स तर कोणाकडे कॉम्पुटर शाखेतील पदवी

इंडिगो ही कंपनी अनेकवर्ष प्रवाशांच्या सेवेत आहे, इतर कंपन्यांच्या तुलनेत ही स्वस्तात सेवा देते. ही कंपनी भारतीय असून दिवसाला १६०० च्या आसपास या कंपनीची विमाने कार्यरत असतात. अनेक पुरस्कारांनी या कंपनीला गौरवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान येत्या काळात राणा अभिनेता वेंकटेश यांच्याबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे, शिवाय त्याच्या ‘हिरण्यकश्यप’ या चित्रपटाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोन्ही चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येतील आणि राणाचं रांगडं व्यक्तिमत्व आणि सुंदर अभिनय पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.