scorecardresearch

“गॉडफादर आला आहे”, सलमान आणि चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’चा पहिला लूक प्रदर्शित

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.

GodFather poster
गॉडफादर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी हे लवकरच मल्याळम चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक ‘गॉडफादर’ बनवणार आहेत. नुकतंच या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात सुपरस्टार चिरंजीवी एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटातील सिनेरसिकांसाठी खूप खास असणार आहे. कारण या चित्रपटाद्वारे बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.

गॉडफादर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. ‘गॉडफादर आला आहे’ असे कॅप्शन रामचरण यांनी दिले आहे.

सलमान खान करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, फोटो शेअर करत चिरंजीवी म्हणाले…

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चिरंजीवी हे एका खुर्चीवर बसल्याचे दिसत आहेत. यात त्यांनी काळ्या रंगाची पँट, ग्रे कुर्ता आणि काळा चश्मा परिधान केला आहे. चिरंजीवी यांचा हा १५३ वा चित्रपट आहे.

‘गॉडफादर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. हा चित्रपट मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक असेल. चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये सलमान हा छोट्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गॉडफादर’ हा पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

“मी साधूच्या वेशात पंढरपुरामध्ये बसलो होतो आणि…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

सलमान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कंचरण, जय प्रकाश हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात अनुष्का शेट्टी, राम चरण आणि श्रुती हासन देखील दिसणार आहेत. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. तो लवकरच ‘पठाण’, ‘कभी ईद कभी दिवाळी’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South superstar chiranjeevi film godfather first look release salman debut in tollywood nrp