scorecardresearch

“मी साधूच्या वेशात पंढरपुरामध्ये बसलो होतो आणि…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या ‘विठ्ठल विठ्ठल’ या चित्रपटातील एक छोटी व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

milind gawali pandharpur wari
मिलिंद गवळी

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे दिसते. नुकतंच मिलिंद गवळी यांनी पंढरीच्या वारीबद्दलचा एक अनुभव सांगितला आहे. याबद्दल त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे.

करोना महामारीनंतर तब्बल २ वर्षांनी पांडुरंगाच्या पंढरीत पुन्हा एकदा हरीनामाचा गजर ऐकायला येऊ लागला आहे. सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीची सर्वत्र चर्चा आहे. याच निमित्ताने मिलिंद गवळी यांनी त्यांच्या ‘विठ्ठल विठ्ठल’ या चित्रपटातील एक छोटी व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. त्यात त्यांनी पंढरीच्या वारीचा विलक्षण अनुभव शेअर केला आहे.

‘गुम है किसीके प्यार में’ मालिका सोडण्याबद्दल आदिश वैद्यने दिले स्पष्टीकरण, म्हणाला “बिग बॉस मराठीसाठी…”

मिलिंद गवळी यांची इन्स्टाग्राम पोस्ट

“आषाढी एकादशी आता जवळ येत आहे. जवळजवळ 21 वर्षापूर्वी “विठ्ठल विठ्ठल “ सिनेमाच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर माझी वारी झाली होती. एक विलक्षण वेगळा अनुभव माझ्या गाठीशी बांधून मी माझ्या आयुष्याचा प्रवास करतो आहे . पांडुरंगाच्या वारीला जाणं हा एक वेगळाच अनुभव आहे , ज्यांनी कोणी वारी केली आहे त्यांनाच तो माहितीये , ज्यांच्या आयुष्यामध्ये वारी घडली नाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी खूप मोलाचा राहून गेलेलं आहे ! काही दिवसापासून पांडुरंगाच्या वारीच्या वारकऱ्यांच्या बातम्या कानावर पडत आहे, छान पाऊस सुरू झाला आहे , “विठ्ठल विठ्ठल “सिनेमा मेकिंगच व्हिडीओ फुटेज मला मिळालं.

सहा सात जुलै 2003 , आळंदी पासून शूटिंग करत करत पंढरपूर पर्यंत आम्ही चाललो होतो. गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित रिफ्लेक्शन मयुर शहा निर्मित वृंदा अहिरे, मिताली जगताप, श्वेता लंडनचे प्यारी शिवपुरी आणि अलकाताई कुबल, प्रसाद ओक व शरद पोंक्षे पाहुणे कलाकार. सगळ्यांसाठीच हा सिनेमा वेगळा अनुभव देऊन गेला. शासनाचे 2 बक्षीस, एवरेस्ट कडे येथे राइट्स आहेत, आता गेली अडीच तीन वर्ष आई कुठे काय करते “ मधल्या अनिरुद्ध देशमुख माझ्या या भूमिकेला बायकांनी असंच शिव्या दिल्या आणि देत आहेत ,अजूनही देतायेत. अशावेळेला “विठ्ठल विठ्ठल “या सिनेमातल्या भूमिकेचा अनुभव खूप आवर्जून आठवतो.

तो अनुभव असा आहे , मी एक साधू संन्याशाच्या वेशात पंढरपुरामध्ये बसलो होतो , शूटिंग सुरू व्हायला थोडा अवकाश होता आणि तीन चार बायका माझ्यासमोर येऊन बसल्या, एका वयस्कर बाईन माझ्या पायावर डोकं ठेवलं , आणि मला म्हणाली “बाबा माझ्या आयुष्याच सार्थक झालेला आहे ,दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत ,मुलगा रांके ला लागलेला आहे ,आता बाबा तुम्ही मला आशीर्वाद द्या ,म्हणजे मी शांतपणे डोळे मिटू शकेन “,मी त्या बाईंना म्हणालो “आजी जात्या विठ्ठलाच्या पाया पड माझ्या नको, मी एक कलाकारे आणि हा साधू चा रोल करतोय “

त्या बाई म्हणाल्या “नाही बाळा ,तूच मला आशीर्वाद दे ,कारण मला दिसतो ना विठ्ठल तुझ्या मध्ये“ कलाकारच आयुष्य किती वेगळ आणि सुंदर आहे बघा ,एका बाजूला अनिरुद्ध देशमुखला एक बाई चपलेने मारेन असं म्हणते आणि “विठ्ठल विठ्ठल “या भूमिकेसाठी एका बाईला माझ्यामध्येच विठ्ठल दिसतो ,पांडुरंग दिसतो. विलक्षण नाही का हे सगळं !विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!, असे त्यांनी ही पोस्ट करताना म्हटले आहे.

“सव्वापाच वाट्या किरीट सोमय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा अन्…, असे बनतात चविष्ट संजय राऊत”, किरण मानेंची फेसबुक पोस्ट

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत चांगली रंजक वळणे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे अनघाचा जिन्यावरून पडून अपघात झाला आहे. तर, दुसरीकडे यशवर खुनाचा आरोप लागला आहे. आपल्या मुलांना या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी अरुंधती पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात परतत असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte milind gawali aka anirudha share instagram post about pandharpur wari nrp

ताज्या बातम्या