“तू मॉडेलसारखी दिसत नाहीस असं हिणवलं जायचं”, ‘गुलाबो सिताबो’ फेम सृष्टी श्रीवास्तवनं सांगितली व्यथा

झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉय’ चित्रपटात सृष्टी श्रीवास्तव झळकली. त्यानंतर तिचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट सुद्धा आला. तिचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.

Gulabo-Sitabo-Fame-Srishti-Srivastava

२०१९ मध्ये रिलीज झालेला ‘गल्ली बॉय’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटाच्या स्टारकास्टपासून ते चित्रपटाच्या कथेपर्यंत सगळ्या गोष्टींना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची केमिस्ट्री या चित्रपटात दमदार होती. पण या चित्रपटात साईड रोलमधील लोकांनाही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. सिद्धांत चतुर्वेदी प्रमाणेच या चित्रपटात साईड रोलमध्ये दिसलेल्या सृष्टी श्रीवास्तवचीही बरीच चर्चा झाली. झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉय’ चित्रपटात सृष्टी श्रीवास्तवने कोणतीही मोठी भूमिका साकारली नाही, मात्र तिच्या छोट्याश्या भूमिकेची सुद्धा खूपच चर्चा झाली. त्यानंतर तिचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनेत्री सृष्टी श्रीवास्तवला बराच संघर्ष करावा लागला आहे. “तू मॉडेलसारखी दिसत नाही” असं अनेकदा तिला हिणवलं असल्याचा खुलासा स्वतः अभिनेक्षी सृष्टी श्रीवास्तवने केला आहे.

‘गुलाबो सिताबो’ फेम सृष्टी श्रीवास्तने नुकतचं एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबाबतीत अनेक खुलासे केले आहेत. सृष्टी श्रीवास्तव ही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन आहे. चित्रपटाच्या व्यतिरिक्त तिने अनेक वेबसीरिजमध्ये सुद्धा काम केलंय. ऑडिशन देत असताना एका दिग्दर्शकाने “तू मॉडेल बनू शकत नाहीस” असं सांगितलं होतं. हा किस्सा आठवत अभिनेत्री सृष्टीने काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

याविषयी बोलताना सृष्टी श्रीवास्तव म्हणाली, “मी अभिनयाला सुरुवात केली तेव्हा मी 4 वर्षांची होते. मला माझ्या आजोबांकडून प्रेरणा मिळाली. ग्रॅज्युएशननंतर मी अभिनयात करिअर करण्याचा विचार केला. त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये एक फिल्म डायरेक्टर आले होते. तेव्हा मी पदवीच्या शेवटच्या वर्षात होते. मला वाटलं की मी दिग्दर्शकांना माझ्या चित्रपटांतील आवडीबद्दल सांगावं. त्यांना माझ्या आवडीबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी मला थिएटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि काही काळानंतर मी ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेतला.”

यापुढे बोलताना सृष्टी म्हणाली की, ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिला कास्टिंग डायरेक्टरने एका भूमिकेसाठी बोलावलं होतं. जेव्हा मी ऑडिशन दिलं तेव्हा मला खात्री होती की माझी निवड निश्चित आहे. पण जसं वाटत होतं तसं प्रत्यक्षात घडलं नाही. माझी निवड होऊ शकली नाही.” “तू मॉडेलसारखी दिसत नाहीस” असं कारण देत तिला या ऑडीशनमधून रिजेक्ट केलं होतं, असं देखील सृष्टी म्हणाली.

आणखी वाचा : Ram Kapoor Birthday: साक्षी तन्वरसोबतचा ‘तो’ लिपलॉक सीन झाला होता व्हायरल

या चित्रपटांमध्ये झळकली सृष्टी श्रीवास्तव

सृष्टीने यापूर्वी ‘गर्लियापा’च्या शोमध्येही काम केलंय. याशिवाय ती ‘ओके जानू’ आणि ‘दिल जंगली’ सारख्या चित्रपटांमध्येही झळकली आहे. चित्रपट केल्यानंतरही सृष्टी श्रीवास्तव रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सृष्टी श्रीवास्तवने थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने मानव कौलच्या ‘चुहल’ या लोकप्रिय नाटकात काम केलंय. यात तिचं पात्र खूप दणकट होतं आणि तिने ही भूमिका मोठ्या उत्साहाने साकारली. त्याचबरोबर तिने ‘शिखंडी’ नाटकातही काम केलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Srishti srivastava in audition that i dont look like a model said prp