scorecardresearch

Premium

‘माझ्या डान्स क्लासबाहेर शाहरूख गौरीची वाट पाहत थांबायचा… ‘

शाहरूख खान आणि गौरी यांनी तब्बल सहा वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्न केले होते

SRK , Shah Rukh Khan, Gauri khan, bollywood, Shiamak Davar, bollywood couples, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
शाहरूख आणि गौरी खान

बॉलीवूडमधील रोमान्सचा बादशहा अशी बिरूदावली मिरवणारा शाहरूख खान एकेकाळी माझ्या डान्स क्लासच्या बाहेर गौरीची वाट पाहत थांबायचा असे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर याने सांगितले. शामक दावरने ट्विटरवर शाहरूख आणि गौरी खान यांच्याबद्दलच्या आठवणीला उजाळा देताना हे सांगितले. त्यावेळी गौरी माझ्या क्लासमध्ये नृत्य शिकत होती तेव्हा शाहरूख क्लासबाहेर तिची वाट पाहत थांबायचा. आज इतका मोठा स्टार होऊनही शाहरूख तितकाच नम्र असल्याचे शामकने म्हटले. शाहरूख खान आणि गौरी यांनी तब्बल सहा वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्न केले होते. गेल्याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या लग्नाना २४ वर्षे पूर्ण झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Srk used to stand outside my dance classes for gauri shiamak davar

First published on: 14-01-2016 at 11:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×