स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय आहेत. या मालिकेतील अप्पू आणि शशांकची आगळीवेगळी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील कुक्की गँग ही प्रेक्षकांच्या मनात राज्य करते. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आणि मालिकेतील कलाकारांमध्ये असलेलं बॉडिंग प्रत्येक भागात दिसून येत आहे. या मालिकेत कुक्कीची भूमिका साकारणारा अभिनेता अतुल तोडणकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अतुल तोडणकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. या मालिकेत ऑनस्क्रीन घडणाऱ्या गमतीजमतीची एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये या मालिकेतील सर्वजण छान हसताना दिसत आहे. यात शशांक, माई, कुकी आणि इतर काही कलाकार दिसत आहे. यात कुकी आणि मालिकेचे दिग्दर्शक हे झोपल्याचे दिसत आहे.

‘सख्या रे’ ते ‘धुरळा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अपूर्वाबद्दल तुम्हाला माहितीये का?

“शूटिंगमध्ये दुपारच्या जेवणानंतर वज्रसनात बसले पाहिजे. आमचे योगगुरू श्री.अमेय कानिटकर यांच्या सूचनेनुसार सगळे अर्थात प्राची, माई, शशांक आणि स्वतः अमेय हे वज्रसनात बसले आहेत. आणि दिग्दर्शकीय सूचनेनुसार कुक्की आणि दिग्दर्शक जेवणानंतर शवासनात बसले आहेत. योगा से ही होगा. कुक्की गँगचे आदरणीय मेंबर्स : अप्पू, सुमी आणि मानसी जेवणानंतर गायब”, असे अतुल तोडणकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“प्रत्येक आईने जमलं तर…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. सध्या या मालिकेत विविध ट्विस्ट येताना दिसत आहे.