बॉलिवूडचा ‘खलनायक’ संजय दत्तला संयुक्त अरब अमिरातीने घातलेल्या प्रवासी निर्बंधानुसार युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. संजय दत्त याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत ही माहिती दिली. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्याने युएई सरकारचे आभार देखील मानले आहेत.
अभिनेता संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देताना एक फोटो देखील शेअर केलाय. यात जीडीआरएफए दुबईचे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री हे अभिनेता संजय दत्तना गोल्डन व्हिसा सोपवताना दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करताना त्याने एक पोस्ट देखील लिहिली आहे. यात त्याने लिहिलंय, “जीडीआरएफए दुबईचे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री यांच्या उपस्थितीत युएईचा गोल्डन व्हिसा स्विकारताना आनंद होतोय. हा सन्मान दिल्याबद्दल युएई सरकारचे खूप खूप आभार…फ्याय दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचं देखील आभार.”
Honoured to have received a golden visa for the UAE in the presence of Major General Mohammed Al Marri, Director General of @GDRFADUBAI. Thanking him along with the @uaegov for the honour. Also grateful to Mr. Hamad Obaidalla, COO of @flydubai for his support pic.twitter.com/b2Qvo1Bvlc
— Sanjay Dutt (@duttsanjay) May 26, 2021
संजय दत्त नेहमीच त्याच्या कामानिमीत्त दुबईमध्ये ये-जा करीत असतो. यंदाची ईद देखील त्याने त्याच्या कुटूंबासह दुबाईमध्येच साजरी केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो सध्या त्याच्या कुटूंबासह दुबईमध्येच राहत आहे. अशात संजय दत्त हा युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला असल्यामुळे आता तो UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थायिक होऊन व्यवसाय देखील करू शकतो. भारतातल्या मेनस्ट्रीम कलाकारांपैकी अभिनेता संजय दत्त हा पहिला कलाकार आहे ज्याला युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वीच दुबईचे क्राउन प्रिंस शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम जुळ्या बाळांचे पिता झाल्याबद्दल अभिनेता संजय दत्तने त्यांचं अभिनंदन केलं होतं. युएईचा गोल्डन व्हिसा हा 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी मिळणारा व्हिसा आहे. त्यामूळे आता हा गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर अभिनेता संजय दत्त युएईत नवे व्यवसाय सुरू करण्याच्या तयारी असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.