महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवांतर्गत दरवर्षी मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार दिले जातात. यंदाचे या पुरस्कारांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून प्राथमिक नामांकन यादी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर तांत्रिक विभाग व बालकालाकार विभागातील अंतिम विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये सवरेत्कृष्ट बालकलाकार म्हणून हंसराज जगताप (धग), सवरेत्कृष्ट छायालेखनासाठी दिवंगत राजन कोठारी (तुकाराम), सवरेत्कृष्ट संकलनासाठी प्रशांत खेडेकर (अजिंठा), सवरेत्कृष्ट रंगभूषेसाठी विक्रम गायकवाड व हेन्री मार्टिस (काकस्पर्श), सवरेत्कृष्ट वेषभूषाकार म्हणून पूर्णिमा ओक (तुकाराम), सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी प्रशांतर राणे व अभिषेक विजयकर (काकस्पर्श) तर सवरेत्कृष्ट ध्वनिमुद्रणासाठी अनिल निकम, पी. के. शनील (येडा) यांचा समावेश आहे.
प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी एकूण १५ चित्रपट निवडण्यात आले असून त्यामध्ये ‘अनुमती’, ‘अजिंठा’, ‘बालक पालक’, ‘भारतीय..म्हंजी का रं भौ?’, ‘धग’, ‘इन्व्हेस्टमेंट’, ‘तुकाराम’, ‘काकस्पर्श’, ‘लावू का लाथ’, ‘माय डियर यश’, ‘नाईट स्कूल’, ‘पुणे ५२’, ‘श्री पार्टनर’, ‘श्यामचे वडील’, ‘शूर आम्ही सरदार’ या चित्रपटांचा समावेश आहे. सवरेत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी सचिन खेडेकर (काकस्पर्श), विक्रम गोखले (अनुमती) आणि गिरीश कुलकर्णी (पुणे५२) यांच्यात चुरस होणार असून सवरेत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी सुखदा यश (माय डियर यश), प्रिया बापट (काकस्पर्श) आणि उषा जाधव (धग) यांच्यात रस्सीखेच होईल. प्रथम पदार्पण दिग्दर्शन पुरस्कारासाठी निखिल महाजन (पुणे ५२), संदेश कुलकर्णी (मसाला) आणि समीर सुर्वे (श्री पार्टनर) यांना नामांकने जाहीर झाली असून वेगवेगळ्या गटांसाठी चिंटू, आम्ही चमकते तारे, परीस, पिपाणी, मोकळा श्वास, कुरूक्षेत्र अशा अंतिम फेरीत निवडण्यात न आलेल्या चित्रपटांनाही नामांकने जाहीर झाली आहेत. प्राथमिक फेरीचे परीक्षण म्हणून जीवनकला, पुरुषोत्तम बेर्डे, सुषमा शिरोमणी, सतेज पोटे, सुरेश जयराम, शशी म्हात्रे, विलास जोगळेकर, जयराज जी, अजित खोत, उदय देवारे, मनोहर कुंटे, सुचिता बांदोडकर, जाफर सुलता, मंगेश राऊळ, कुमार सोहोनी यांनी काम पाहिले. अंतिम फेरीसाठी जाहीर झालेल्या नामांकनांतून पाच तज्ज्ञ परीक्षक विविध पुरस्कारांसाठी निवड करणार आहेत.
यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यामुळे राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा दिमाखदार स्वरूपात न करता रवींद्र नाटय़ मंदिर येथे बंदिस्त स्वरूपात आणि साधेपणाने २ मे रोजी रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित केला जाणार आहे. महातेस्वाची अंतिम फेरी १६ एप्रिल रोजी होणार असून त्या दिवसापासून दररोज सकाळी १०.३० वाजता रसिकांना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये अंतिम फेरीतील चित्रपट विनामूल्य दाखविण्यात येतील.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2013 रोजी प्रकाशित
राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवांतर्गत दरवर्षी मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार दिले जातात. यंदाचे या पुरस्कारांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून प्राथमिक नामांकन यादी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे.
First published on: 17-04-2013 at 01:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State marathi cinema awards in golden jubilee year